Madhya Pradesh Gangrape: मध्य प्रेदशात महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल; दोघांना अटक

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नीमच (Neemuch) जिल्ह्यातील 30 वर्षीय महिला कॉन्स्टेबलवर Woman Constable) सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नीमच (Neemuch) जिल्ह्यातील 30 वर्षीय महिला कॉन्स्टेबलवर Woman Constable) सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ही घटना घडली असून पीडिताने 13 सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या आईला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी अनुराधा गिरवाल यांनी दिली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबलची पाच महिन्यांपूर्वी फेसबुकवर पवन नावाच्या तरुणाशी मैत्री झाली आणि तेव्हापासून तो तरुण सतत त्या महिलेशी बोलत होता. पवनने त्या महिलेला आपल्या लहान भावाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केले, जिथे पवनसह तीन पुरुषांनी महिलेवर कथित बलात्कार के, एवढेच नव्हेतर, या घटनेचा अश्लील व्हिडिओ तयार सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देण्यात आली, असे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे. हे देखील वाचा-Ghaziabad Serial Killer: एका पाठोपाठ कुटुंबातील 5 जणांना संपवले, 20 वर्षानंतर सिरिअल किलरचे बिंग फुटले; गाजियाबाद येथील खळबळजनक घटना

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीच्या आईने महिला कॉन्स्टेबलला धमकावले. तसेच आरोपीच्या नातेवाईकाने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, असा दावा पीडित महिला कॉन्स्टेबलने केला आहे. पीडित मूळची नीमचची रहिवासी आहे. सध्या ती इंदूर जिल्हा पोलीसात कार्यरत आहे. पण सुरुवातीला ती नीमच येथे तैनात होती.