'व्हर्जिन मुली या सीलबंद बाटलीप्रमाणे असतात'; प्राध्यापकाने उधळली मुक्ताफळे
कनक सरकार (Photo credit : FaceBook)

कोलकाता : जाधवपूर विद्यापीठा (Jadavpur University) तील एका प्राध्यापकाच्या स्त्रियांसंदर्भातील वादग्रस्त पोस्टमुळ फार मोठा गदारोळ माजला आहे. या प्राध्यापक महाशयांनी स्त्रियांच्या कौमार्यावर आपले विचार व्यक्त केले आहेत, जे अतिशय आक्षेपार्ह आहेत. आजच्या या 21 व्या शतकातही, स्त्रीचे महत्व हे फक्त तिच्या कौमार्यावर आधारीत आहे या बाबतीत ही मुक्ताफळे असल्याने, चहूबाजूंनी या प्राध्यापकावर टीका होत आहे. कनक सरकार (Kanak Sarkar) असे या प्राध्यापकाचे नाव आहे. ‘बहुतेक मुले ही मूर्ख असतात, त्यांना कुमारी वधूचे महत्व लक्षात येत नाही. कुमारी वधू ही एखाद्या बंद बाटली अथवा बंद पाकीटाप्रमाणे असते. तुम्ही सील तुटलेली कोल्ड ड्रिंकची बाटली किंवा बिस्किट खरेदी कराल का?’ या आशयाची ही पोस्ट आहे.

इतकेच नाही तर, पुढे हे महाशय ‘मुलगी जन्माला आल्यापासून ती उघडली जाऊपर्यंत सील्ड असते. कुमारी मुलीचा अर्थ संस्कृती, मुल्ये तसेच लैंगिक स्वच्छतेसोबत अनेक गोष्टी आहेत. अनेक मुलांसाठी कुमारी वधू एखाद्या परीप्रमाणे असते.' असेही म्हणतात. एखाद्या प्रध्यापकाचे स्त्रियांच्या बाबतीत असे विचार आहेत हे पाहिल्यावर अनेकांनी या पोस्टवर आक्षेप घेतला, टीका केली. शेवटी सरकार महाशयांनी ही पोस्ट काढून टाकली आहे. (हेही वाचा : कौमार्य चाचणी विरोधात लढणारी ऐश्वर्या येताच दांडीया बंद, निघून जाता पुन्हा सुरु)

मात्र त्यानंतर त्यांनी अजून एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये ते विचारांच्या अभिव्यक्तीबद्दल बोलतात. आपले विचार हे चुकीचे नाहीत, हे पटवून देण्यासाठी त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, ‘सुप्रीम कोर्टाने 66 A या कायद्यांतर्गत मला माझे मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. आपण नेहमी महिलांच्या अधिकाराबद्दल बोलत असून, हे माझे वैयक्तिक मत होते. मी कोणत्याही व्यक्तीविरोधात तसेच कोणत्याही पुराव्याशिवाय काहीही लिहिलेले नाही. मी समाजाच्या चांगल्यासाठीच लिखाण करत आहे. माझ्या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर होत आहेत, कृपया लोकांनी स्वतःची दिशाभूल करून घेऊ नये.’ अशी ही पोस्ट आहे.