kolkata rape case

VIDEO: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरची क्रूर हत्या आणि बलात्काराच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान, सोनागाची रेड-लाइट एरियातील सेक्स वर्कर्स देखील न्यायाच्या मागणीत सहभागी झाल्या होत्या. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान एका महिला समुपदेशकाने केलेले भावनिक आवाहन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, जर कोणाला सेक्सची एवढी इच्छा असेल तर त्यांनी कोणाचे आयुष्य उध्वस्त करण्यापेक्षा रेड-लाइट एरियात येऊन आपला छंद पूर्ण करावा. महिला सेक्स वर्कर म्हणाल्या, “कोलकात्यात मोठा रेड-लाइट एरिया आहे. तुम्हाला सेक्सची एवढीच इच्छा असेल तर इथे या, महिलांवर बलात्कार करण्यापेक्षा इथेच तुमचा छंद पूर्ण करा. त्यांच्या या आवाहनावर लोक भावूक झाले आहेत. हे देखील वाचा: Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: पत्रकार मोहिनी जाधव यांच्याबद्दल शिवसेना नेते वामन म्हात्रे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य, 'तुमच्यावर बलात्कार झाला आहे काय'

कोलकात्यात घडलेल्या घटनेत, काय झालं?

रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टरचा मृतदेह आढळून आल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी घडली होती. या निर्घृण हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेची आणि लैंगिक हिंसाचाराच्या विरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी आणखी तीव्र झाली आहे. सोनागाचीचा रेड-लाइट एरिया हा कोलकातामधील एक प्रसिद्ध क्षेत्र आहे, जिथे सेक्स वर्कर्सनेही या प्रकरणावर आपला संताप आणि निराशा व्यक्त केली आहे. महिला आणि मुलांसाठी हेल्पलाइन तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला मदत हवी असल्यास, खालील हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा:

चाइल्डलाइन इंडिया – 1098

हरवलेली मुले आणि महिलांसाठी – 1094

महिला हेल्पलाइन – 181

राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाइन - 112

नॅशनल कमिशन फॉर वुमन हेल्पलाइन अगेन्स्ट व्हायलेंस - 7827170170

पोलीस महिला आणि ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन - 1091/1291