गोव्यातील 'या' प्रसिद्ध पर्यटनठिकाणी एका फोटोसाठी भरावा लागेल 500 रुपयांपर्यंत 'स्वच्छता कर'
याठिकाणी अनेक लोक समुद्र किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. गोव्यामधील पर्यटन ठिकाणांपैकी 'पर्रा' हे गाव पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. परंतु, आता तुम्हाला या गावात पर्यटनासाठी जायचं असेल, तर 100 ते 500 रुपये 'स्वच्छता कर' द्यावा लागणार आहे.
भारतात गोवा राज्य (Goa State) पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक लोक समुद्र किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. गोव्यामधील पर्यटन ठिकाणांपैकी 'पर्रा' हे गाव (Parra village) पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. परंतु, आता तुम्हाला या गावात पर्यटनासाठी जायचं असेल, तर 100 ते 500 रुपये 'स्वच्छता कर' (Mission Clean Parra Tax) द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे केवळ एका फोटोसाठीदेखील हा कर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा - मुंबई गोवा प्रवास आता आलिशान क्रुझमधून...)
'पर्रा' हे गाव उत्तर गोव्यात असून गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं गाव आहे. तसेच या गावात अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. या गावात अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे पर्यटकांना यापुढे 100 ते 500 रुपयांपर्यंत स्वच्छता कर द्यावा लागणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय पर्रा ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयाविरोधात गोवा वाहतूक आणि पर्यटन संघटनेचे सॅविओ मेस्सिआस यांनी नाराजी दर्शवली आहे. या प्रकारे कर आकारल्याने सर्वसामान्य पर्यटकांची पिळवणूक होईल, असंही सॅविओ यांनी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
हेही वाचा - HIV Test लग्नाच्या नोंदणीसाठी बंधनकारक? गोवा सरकार नवा नियम अंमलात आणण्याच्या विचारात
पर्रा गावात अनेक चित्रपटांचे शुटिंग करण्यात आले आहे. 'डिअर झिंदगी' या आलिया आणि शाहरुखच्या चित्रपटातील काही दृश्य याठिकाणी चित्रीत करण्यात आले आहेत. या गावात एका पर्यटकाकडून 500 रुपयांचा कर आकारण्यात आला. याची पावती देतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पर्यटकांकडून कर आकारण्याला विरोध होत असला, तरी पर्रा गावचे सरपंच लोबो यांनी याचं समर्थन केलं आहे. लोबो यांनी कर आकारणं योग्यच असल्याचं म्हटलं आहे.