...म्हणून तो मंगळवारी दिवसाढवळ्या चोरी करायचा
फोटो सौजन्य - फाइल फोटो

काही लोकांच्या अंधश्रद्धेवनुसार मंगळवारी केस कापू नये, मासांहार करु नये अशा बऱ्याच गोष्टींना विरोध केला जातो. मात्र हैद्राबादचा एक भामटा फक्त मंगळवारी दिवसाढवळ्या चोरी करायचा हा विचित्र प्रकार पोलिसांसमोर उघडकीस आला आहे.

मोहम्मद समीर खान आणि त्याचा मित्र मोहम्मद शोएब असं या दोन आरोपींची नावे आहेत. आरोपी फक्त मंगळवारीच भरदिवसा लोकांना लूटत होता. मात्र या घटनेतील आरोपी मोहम्मद समीर खान याला डोळ्यांनी कमी दिसायचे. त्यामुळे त्याने या चोरीमध्ये त्याचा मित्राला सहभागी करुन घेतले होते.

परंतु सोमवारी रात्री हे दोघे चोरी करण्याचे ठरवित होते त्याच वेळी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच चौकशीदरम्यान या आरोपींनी बंगळूरु, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही भागात चोरी केली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तर या दोन आरोपींकडे 21 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.