Shocking! इंदूरमध्ये होळीच्या सणाला गालबोट; नाचताना स्वतःच्याच छातीत चाकू भोसकून तरुणाने गमावला जीव, Watch Video
नाचताना तरुणाने स्वतःच्या छातीत केले चाकूने वार (PC - Twitter)

मध्य प्रदेशातील इंदूर (Indore) मध्ये हातात चाकू घेऊन होळी साजरी करणे एका तरुणाला खूपचं भारी पडलं आहे. नाचत असताना गोपाल नावाच्या तरुणाने स्वतःच्या छातीत चाकूने वार केले. यानंतर त्यांच्या छातीतून रक्त येऊ लागले आणि त्यांची प्रकृती गंभीर होऊ लागली. हे पाहून तेथे उपस्थित लोकांनी गोपालला रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना बाणगंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद कॉलनी येथील आहे. कुटुंबीयांनी गोपालसोबत नाचत असलेल्या मित्रांवर हत्येचा आरोप केला आहे.

तरुणाच्या मृत्यूनंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. होळी पेटवल्यानंतर गोपालने गोविंद कॉलनीतचं मित्रांसोबत होळी खेळण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते. यादरम्यान या लोकांनी गाणे लावले आणि नाचायला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, या काळात गोपाल आणि इतर जण दारूच्या नशेत होते. नाचत असताना अचानक गोपालने हातात चाकू घेतला. यानंतर त्याने छातीवर चाकू भोसकल्यासारखे वर्तन करण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत असल्याने हा सर्व प्रकार लवकर लक्षात आला नाही. गोपालच्या छातीत चाकू खोलवर घुसला असल्याचे म्हटले जाते. (हेही वाचा - Russia-Ukraine War: तब्बल तीन आठवड्याने मायदेशी परतणार भारतीय विद्यार्थी Naveen Shekharappa चा मृतदेह; रशिया युक्रेन युद्धात झाला होता मृत्यू)

गोपालच्या छातीतून रक्त येत असल्याचे पाहून एक महिला त्याच्याजवळ आली आणि आरडाओरडा करू लागली. यानंतर इतरांचेही लक्ष त्याच्याकडे गेले. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचवेळी काही लोक डान्सचा व्हिडिओ बनवत होते. ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी मृत गोपालच्या नातेवाईकांनी नाचणाऱ्या मित्रांवर खुनाचा आरोप केला आहे. बाणगंगा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.