Abhiyuday Mishra Dies: प्रसिद्ध YouTuber अभ्युदय मिश्रा याचा रस्ते अपघातात मृत्यू , Skylord च्या लाखो सबस्क्राईबरला बसला धक्का
Abhiyuday Mishra (PC - Facebook)

Abhiyuday Mishra Dies: स्कायलॉर्ड (Skylord) या यूट्यूब चॅनलच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. प्रसिद्ध यूट्यूबर आणि 'स्कायलॉर्ड' चॅनेलचे मालक अभ्युदय मिश्रा (Abhiyuday Mishra) यांचे मध्य प्रदेशात एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले. अभ्युदय मिश्रा यांना त्यांचे चाहते 'स्कायलॉर्ड' या नावाने ओळखत होते. यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आणि चाहते होते. सोशल मीडियावर लोक आता अभ्युदय मिश्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अभ्युदय हे मध्य प्रदेशचे रहिवासी होते. सोमवारी दुचाकी चालवत असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

'स्कायलॉर्ड' नावाचे यूट्यूब चॅनल चालवणारे अभ्युदय मिश्रा रस्त्यावरील अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना वाचवता आले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी दुपारी 2 वाजता नर्मदापुरम-पिपरिया राज्य महामार्गावर सोहागपूरजवळ अभ्युदयला ट्रकने धडक दिली आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. 'स्कायलॉर्ड' म्हणून ओळखला जाणाऱ्या मिश्रा इंस्टाग्रामवर देखील लोकप्रिय होता. जेथे त्यांचे सुमारे 3.5 लाख फॉलोअर्स होते. Skylord त्याच्या YouTube चॅनेलवर गेमिंग व्हिडिओ बनवण्यासाठी ओळखला जात होता. (हेही वाचा -Beating Case: कार्यक्रमात मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावर आक्षेप घेतल्याने पिता-पुत्राला मारहाण)

 

View this post on Instagram

 

A post shared by SkyLord (@iamskylord69)

अभ्युदय मिश्रा रविवारी बाइकिंग दौऱ्यावर गेला होता. ज्याचे आयोजन स्वतः मध्य प्रदेश सरकारने केले होते. अपघातानंतर त्यांना भोपाळच्या बन्सल रुग्णालयात नेण्यात आले. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या अधिकाऱ्याने पुष्टी केली की, YouTuber सोहागपूरमध्ये अपघात झाला होता. अभ्युदयाला धडक देणाऱ्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभ्युदयच्या जाण्याने त्यांचे चाहते आणि अनुयायांना धक्का बसला आहे, तर कुटुंबीयांची अवस्था बिकट आहे.