Online Fraud: भाजप नेत्याने Amazon वरून 30 हजार रुपयांची साउंड सिस्टीम केली खरेदी, बॉक्स उघडला तर निघाली रद्दी
Representational Image ((Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

या डिजिटल युगात सर्व काही ऑनलाइन (Online) झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. यावेळी रेवाडीचे भाजप नेते सुनील मूसेपूर (Sunil Musepur) हे ऑनलाइन फसवणुकीचे (Online Fraud) बळी ठरले आहेत. त्यांनी ऑनलाइन अॅमेझॉन शॉपिंग साइटवरून 30 हजार रुपये किमतीची साउंड सिस्टीम खरेदी केली होती. त्यांच्या या उत्पादनाची डिलिव्हरी झाली तेव्हा त्यात रद्दीच्या वस्तू बाहेर आल्या आहेत. बॉक्सच्या आत एक जुना स्पीकर आणि पुठ्ठा होता.  बॉक्समधील साउंड सिस्टीम वाजवण्याऐवजी रद्दी बाहेर आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली.

त्यानंतर पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले आणि तक्रारीच्या आधारे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी डिलिव्हरी बॉय संदीप सांगतो की, कंपनीच्या गोदामातून त्यांना माल दिला जातो. बॉक्सच्या आत काय केले जाते याची त्यांना जाणीव नसते. ते फक्त यादीनुसारच माल देतात. (हे देखील वाचा: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे लाऊडस्पीकर वादावर मोठे वक्तव्य, म्हणाले, 'आमचा पक्ष मशिदींचे संरक्षण करणार')

सध्या पोलिसांनी या प्रकरणी तक्रार घेऊन तपास सुरू केला आहे. अशा परिस्थितीत हे उत्पादन पॅकिंग कोठून केले होते, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. पॅकिंग केल्यानंतर ही रद्दी कोणाच्या हातात गेली आणि कुठून या बॉक्समध्ये भरून डिलिव्हरीसाठी पाठवली गेली यांची ही चौकशी केली जाणार आहे.