सर्जिकल स्ट्राईक2: शेअर बाजारात घसरण रुपयाची घसरण, सेंसेक्‍स 409 अंकांनी तर, निफ्टी 127 अंकांनी घसरला
indian share market | (Photo credit: archived, edited, representative image)

surgical strike 2: पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने जोरदार बदला घेतला. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरच्या पलिकडे जाऊन दहशतवादी तळ उदद्ध्वस्त केले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार, 26 फेब्रुवारी) शेअर बाजार सुरु झाला. शेअर मार्केटची (Indian Share Market) आजची सुरवात काहीशी घसरणीनेच झाली. व्यवहार सुरु झाले तेव्हा सेन्सेक्क 460 अंकांनी घसरला. बाजार सुरु होताना 171 शेअर वाधारणीने सुरुवात करु पाहात होते त्या ठिकाणी 170 शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली. वृत्त हाती आले तेव्हा सेन्सेक्स 409 अंकांसोबत 35803.74 वर आपली कामगिरी करत होता. तर, दुसऱ्या बाजूला निफ्टी 127 अंकांनी घसरुन 10753 अंकांवर कामगिरी करत होता.

 गुंतवणुकीवर मोठा परिणाम

पुलवामा हल्ल्यांनंतर सुमारे 2 आठवड्यांनंतर भारतीय लष्कराने खास करुन भारतीय हवाई दलाने मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे तीन वाजता पाकिस्तानच्या हद्दीत खुसून दहशतवादी तळ उदद्ध्वस्त केले.ब्रोकर्सच्या हवाल्याने प्रसारमाध्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजफ्फराबाद सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने लाईन ऑफ कंट्रोल (LOC)वर कारवाई केल्यानंतर गुंतवणुकीवर मोठा परिणाम झाला. (हेही वाचा, होय, भारतीय लष्कराने कारवाई केली, दहशतवाद्यांचा सर्वात मोठा तळ उदद्ध्वस्त केला: भारतीय परराष्ट्र सचिव)

कोणकोणते शेअर्स घसरले आणि वधारले

हीरो मोटोकॉर्प, टाटा स्‍टील, वेदांता, सन फार्मा, आईसीआईसीआई बैंक, एसबीआई, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, बजाज फाइनान्स, इन्‍फोसिस, एनटीपीसी, एचडीएफसी, मुारुती सुझुकी, बजाज ऑटो, इंडसइंड बँक आदी कंपन्यांचे शेअर्स घसरले तर, दुसऱ्या बाजूला टीसीएस, हिंदुस्‍तान यूनिलीव्हर आणि टाटा मोटर्स या कंपन्यांचे शेअर्स वधारले.