खेळण्यास गेलेल्या मुलाचे पिसाळलेल्या कुत्र्यांनी शरारीराचे  तोडले लचके, मृत्यू
फोटो सौजन्य- Unsplash

गोरखपुरमध्ये कुशीनगर येथे खेळण्यास गेलेल्या सात वर्षाच्या मुलाचे तेथील पिसाळलेल्या कुत्र्यांच्या टोळीने त्या मुलावर हल्ला केला. याप्रकरणी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शोएब असे या मृत मुलाचे नाव आहे. शोएब हा गावाजवळील एका शाळेजवळ खेळण्यास गेला होता. मात्र त्या शाळेजवळ जास्त कोणाचे येणे- जाणे होत नव्हते. त्यावेळी शाळेच्या नजीक पिसाळलेल्या कुत्र्यांच्या टोळीने शोएबला एकट्यात खेळताना पाहिले. त्यावेळी या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करत शरीराचे लचके तोडले. या प्रकरणी शोएब गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घरातील मंडळींना सांगितले. या घटनेमुळे शोएबच्या घरातील मंडळींना धक्का बसला आहे.

तसेच पोलिसांकडून या घटनेची तपासणी करण्यात येत आहे. तर गावातील लोक मांसाहाराचे जास्त सेवन होत असल्याने हा प्रकार घडल्याचे सांगत आहेत. तर कुत्र्यांना दिवसभर काही खाण्यासाठी मिळत नसल्याने ते हिंसक झाले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.