गुगल मॅपवरुन ट्रॅफिक पाहून लोकांना लुटायचे, आरोपींना अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: New York Post)
चोरी करण्यासाठी लोक काय काय करतील याचा नेम नाही. अशीच एक चोरीची  घटना नोएडा येथे घडली आहे. चोरांनी लोकांना लुटण्यासाठी चक्क गुगल मॅपवरुन ट्रॅफिक पाहून लोकांना लुटण्याचा प्रताप केला आहे.
मुशीर आणि हर्ष असे या आरोपींची नावे आहेत. हे दोघे गुगल मॅपच्या  सहाय्याने ज्या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ नसायची अशा ठिकाणी हे दोघे लोकांना लुटत होते. त्यामुळे चोरी करण्याच्या पूर्ण तयारीनिशी हे दोघे ट्रॅफिक कुठे खाली आहे याचा अंदाज घ्यायचे. त्यानंतर या दोघांनी ठरविलेल्या प्रमाणे चोरी करण्यास सज्ज व्हायचे. तसेच लाल रंग हा त्यांच्यासाठी शुभ असल्याने लाल रंगाच्या पायमोजांचे उपयोग करुन चोरी करत.
या आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आले असून तुरुंगात त्यांची रवानगी केली आहे. तर 15 दिवसांपूर्वी या दोघांनी एका शिक्षिकेच्या हातातील बांगड्या पळवल्या असल्याचे आरोपींनी कबुल केले आहे.