RBI, Amazon Pay (PC - Twitter)

RBI Penalty on Amazon Pay: नियमांचे पालन न केल्याबद्दल RBI ने Amazon Pay वर 3.06 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, प्रीपेड पेमेंट मानके (PPT) संबंधित काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल अॅमेझॉन पे (Amazon Pay) प्रायव्हेट लिमिटेडवर 3.06 कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावला आहे. आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, अॅमेझॉन केवायसी नियमांबाबत आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे पालन करत नाही.

RBI ने Amazon Pay ला नोटीस बजावून निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड का लागू करू नये, याची कारणे दाखवा असा सल्ला दिला होता. आरबीआयने सांगितले की, तपासात आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप खरा असल्याचे सिद्ध झाले आहे. (हेही वाचा - RBI Banned 5 Banks: आरबीआयने 'या' 5 बँकांवर घातली बंदी; महाराष्ट्रातील 2 बँकाचा समावेश, तुमच्या बँकेचं यात नाव नाही ना? चेक करा)

Amazon Pay वर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

RBI च्या म्हणण्यानुसार, युनिटच्या प्रतिसादाचा विचार केल्यानंतर, RBI ने असा निष्कर्ष काढला की बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल आर्थिक दंड आकारला जावा. तथापि, मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की दंड नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि अॅमेझॉन पे (इंडिया) द्वारे त्याच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा हेतू नाही. Amazon Pay ही Amazon ची डिजिटल पेमेंट शाखा आहे.