Bharat Jodo Yatra: राहुल गांधींनी शेअर केला सोनिया गांधींसोबतचा भावनिक फोटो; म्हणाले, 'यांच्याकडून मिळालेले प्रेम देशासोबत शेअर करतोय'
Rahul Gandhi shares photo with Sonia Gandhi (PC - Twitter/Rahul Gandhi)

Bharat Jodo Yatra: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) शनिवारी दिल्लीतील भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi) सामील झाल्या. सध्या सोशल मीडियावर या दोघांचा एक फोटो व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सोनिया गांधीसोबतचा फोटो शेअर केला आहे. जो यात्रेदरम्यान आई आणि मुलगा यांच्यातील भावनिक बंध दर्शवित आहे.

भारत जोडो यात्रेतील एक भावनिक फोटो शेअर करत राहुल गांधींनी लिहिले, 'तिच्याकडून मला मिळालेले प्रेम मी देशासोबतचे शेअर करत आहे.' या फोटोमध्ये, सोनिया गांधी हसताना दिसत असून राहुल गांधी त्यांना मीठी मारताना दिसत आहे. आई आणि मुलातील हा भावनिक क्षण कॅमेऱ्याने कैद झाला असून अनेकजण या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. (हेही वाचा - Rahul Gandhi यांची Bharat Jodo Yatra राजधानी दिल्ली मध्ये दाखल (Watch Video))

शनिवारी राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने दिल्लीत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा सामील झाले होते. सकाळच्या मुक्कामासाठी यात्रा आश्रम चौकात येण्यापूर्वी सोनिया गांधी मास्क घालून राहुल गांधी आणि मुलगी प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासोबत काही मिनिटे चालत गेल्या. (हेही वाचा - Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला एक आठवडा पुर्ण, राहुल गांधींनी दिली 'अशी' प्रतिक्रिया, साधला भाजपवर निशाणा)

सप्टेंबरमध्ये कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या यात्रेत माजी काँग्रेस अध्यक्ष सहभागी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये कर्नाटकात असताना सोनिया गांधी यांनी मोर्चात भाग घेतला होता. ऑक्टोबरच्या सुरुवातीला, भारत जोडो यात्रेदरम्यान, एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यामध्ये काँग्रेस खासदार आपल्या आईच्या बुटाची लेस बांधण्यासाठी वाकताना दिसत होते. हा क्षण काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला होता.