Polling staff Bus Accident: मतदान कर्मचाऱ्यांचा बसचा भीषण अपघात, होमगार्ड जवानाचा मृत्यू, मंदसौर येथील घटना
Polling Party Bus Accident Mandsaur PC TWITTER

Polling staff Bus Accident: मतदान संपल्यानंतर मंदसौरमध्ये मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. मंदसौर- सुवासरा मार्गावरील सुवासरा येथील राठोड कॉलनीजवळ उभ्या असलेल्या ट्रकला बसची धडक लागल्याने हा अपघात झाला. या अपघातात ट्रक आणि बसचे भरपूर नुकसान झाले आहे. बसमधील अनेक निवडणूक कर्मचारी जखमी झाले आहे. या भीषण अपघातात एका होमगार्ड जवानाचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा- चारधाम यात्रेदरम्यान तरुणांनी गाडीच्या छतावर बसून केले मद्यपान; पोलिसांनी शिकवला धडा)

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा पर्यंत मतदान केंद्रावरील काम आपटून बसने जात असताना मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. बसचे मागच्या बाजूचा टायर फुटल्याने अनिंयत्रित होऊन बस ट्रकला जाऊन धडकली. हीधडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहने यात चक्काचूर झाले. बसमधील सात ते आठ कर्मचारी या अपघातात जखमी झाले. तर एका होमगार्ड जवानाचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.  मंगळवारी पहाटे सातच्या दरम्यान हा अपघात झाला अशी माहिती समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे अपघातानंतर बस चालक गोपाल सिंग आणि क्लीनर घटनास्थळावरून फरार आहे. मनोहर सिंग (३४) असं मृत झालेल्या जवानाचे नाव होते. प्रसाशकीय अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहे.