BJP MP Pragya Thakur | (Photo Credits-ANI)

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर (BJP MP Pragya Thakur) यांनी पुन्हा एकदा अवैज्ञानिक विधान केले आहे. ज्यामुळे त्या भलत्याच चर्चेत आल्या आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी भाजप नेत्यांच्या मृत्यूस काँग्रेस आणि इतर राजकीय विरोधी पक्षांना जबाबदार धरत आरोप आहे. प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे की, भाजप (BJP) नेत्यांविरुद्ध काँग्रेस 'मारक शक्ती' (Marak Shakti) चा वापर करत आहे. 'मारक शक्ती'चा वापर केल्यानेच भाजप नेत्यांचा मृत्यू होत असल्याचे या महिला खासदार महोदयांचे म्हणने आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांचा हे विधान करतानाचा व्हिडिओही प्रसिद्ध झाला आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी म्हटले की, 'एकदा महाराज जी यांनी मला सांगितले की, सध्या आपला वाईट काळ सुरु आहे. विरोधक काही करत आहेत. ते भआजपच्या विरुद्ध मारक शक्तिचा वापर करत आहेत. मी त्यांचे बोलणे कालांतराने विसरुन गेली. परंतू, आता जेव्हा भाजपचे ज्येष्ठ आणि महत्त्वाचे नेते एकापाठोपाठ एक असे निधन पावत आहेत ते पाहता मला महाराज जी यांचे बोल आठवतात. त्यामुळे मला आता असे वाटते की, ते योग्य बोलत होते.'

दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या विधानालाला त्यांचे ते व्यक्तीगत मत आहे, असे म्हणून भाजपने स्वत:ची सुटका करुन घेतली आहे. मध्यप्रदेश भाजपचे नेता आणि विरोधी पक्ष नेते गोपाल भार्गव यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या विधानावर आपल्याला काहीच प्रतिक्रिया द्यायचे नाही, असे म्हटले आहे. तर, काँग्रेस पक्षाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य; काँग्रेस नेते शशी थरुर विरुद्ध केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद सामना रंगला)

एएनआय ट्विट

दरम्यान, या आधीही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी असेच वादग्रस्त विधान करत आम्ही लोकांची गटारे साफ करण्यासाठी खासदार झालो नाही असे म्हटले होते. त्यावरुनही जोरदार वाद रंगला होता. तसेच, महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचे खळबळजनक आणि तितकेच वादग्रस्त विधानही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी केले होते. त्यावरुनही जोरदार वाद रंगला होता.