Union Minister Nitin Gadkari | (Photo Credits: PTI)

Nitin Gadkari Net Worth: आपल्या कामामुळे नितीन गडकरी यांच्यावर विरोधकांडून कधी टीका होत नाही. विरोधी पक्षाचे नेतेही त्यांचे कौतुक करतात. नितीन गडकरी यांच्याकडे आजच्या घडीला चल-अचल अशी एकूण किती संपत्ती (Property)आहे. याबाबत जाणून घेऊया. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर पुन्हा एकदा भाजपने लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha Election) विश्वास दाखवत नागपुरातून उमेदवारी दिली आहे. तिकिट मिळाल्यानंतर आज बुधवारी गडकरींनी उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी नागपुरात भव्य रोड शो काढला. नितीन गडकरी यांच्या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन गडकरी यांचे सध्याचे वय 66 वर्षे आहे. त्यांच्या कामामुळे त्यांना 'इन्फ्रास्ट्रक्चर मॅन' म्हणूनही ओळखले जाते. देशातील मोठ-मोठे महामार्ग बांधण्याचे नवनवे रॅकोर्ड त्यांच्या नावावर आहेत. त्यादृष्टीने ते कामदेखील करत असतात. (हेही वाचा :Nitin Gadkari On Loksabha Election 2024: 'मी ही निवडणूक 5 लाखांहून अधिक मतांनी जिंकेन'; नितीन गडकरी यांचा दावा )

2014 साली भाजप सत्तेत आल्यानंतर नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सोपवण्यात आले. 2019 साली लोकसभा निवडणुकीच्यावेळी गडकरी यांनी जाहिर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे असलेल्या चल संपत्तीविषयी त्यांनी नमूद केले की, त्यांची एकूण 69,38,691 रुपयांची चल संपत्ती होती. त्याशिवाय, त्यांची पत्नी कांचन गडकरी यांच्याकडे 91,99,160 रुपयांची चल संपत्ती होती. नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी यांच्या बँक बॅलेंस विषयी बोलायच झालं तर, त्यांच्या अकांऊंचमध्ये 8,99,111 रुपये आहेत. तर, त्यांची पत्नी कांचन यांच्या बँक खात्यात 11,07,909 रुपये आहेत. नितीन गडकरी यांच्या नावावर 1,57,21,753 इतके बँकेचे कर्ज आहे. त्यांच्याकडे एकूण 6 कार असून त्यातील 4 कार त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत. (हेही वाचा :Nitin Gadkari On Toll Exemption: 'महामार्गांवर प्रवास टोल फ्री होणारच नाही' मंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ होतोय वायरल (Watch Video) )

नितीन गडकरी यांच्याकडे 6,95,98,325 इतकी अचल संपत्ती आहे. तर, त्यांची पत्नी कांचन गडकरी यांच्याकडे 6,48,60,325 रुपयांची अचल संपत्ती आहे. नितीन गडकरी यांच्याकडे नागपुरच्या धपेवाडामध्ये 29 एकर इतकी जमीन आहे. तर, त्यांची पत्नी कांचन यांच्यानावे 15 एकर इतकी जमीन आहे. तर, मुंबईतील वरळी येथील एमएलए सोसायटीत एक फ्लॅट आहे. नितीन गडकरी यांच्याकडे नागपुरातील महाल येथे वडिलोपार्जित घर आहे. नितिन गडकरी यांच्या इनकम सोर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्याकडे बिझनेस, शेती आणि पगार येथून उत्पन्न येते. तर, अन्य स्त्रोत मिळून वर्षाला 12 कोटी रुपयांची कमाई होते. नितीन गडकरी यांचा शेती हा व्यवसायदेखील आहे. नितीन गडकरी यांनी एकदा म्हटलं होतं की, त्यांना या व्यवसायातून 12 ते 15 कोटींचा नफा मिळतो.