भाजपच्या पराभवासाठी विरोधक कारणे शोधतायेत, EVM वरुन नरेंद्र मोदींचा टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी (File Photo, Photo Credit -Twitter BJP)

येत्या आगामी 2019 मधील लोकसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi)यांनी आक्रमकतेचा पवित्रा उचलल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदी यांनी येणारी निवडणुक लक्षात ठेवून विरोधी पक्षावर टीकेची झोड उठविली आहे. तसेच विरोध पक्षाकडून भाजप पक्षाच्या पराभवासाठी इव्हीएम (EVM) वरुन प्रश्न विचारण्यास सुरु केले आहे.

तसेच शनिवारी (19 जानेवारी) कोलकता (Kolkata) येथे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या मंचावर एकत्रित आलेल्या विरोधकांवरही जोरदार टीका मोदींनी केली आहे. तसेच बॅनर्जींच्या मंचावर विविध पक्षांनी महाआघाडी केली असली तरीही आम्ही जनतेशी महाआघाडी केल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. त्यामुळे कोणाची महाआघाडी चांगली हे तुम्हीच ठरवा असा सवाल मोंदीने उपस्थित केला आहे. (हेही वाचा-मोदी सरकारची Expiry Date संपली, ममता बॅनर्जी यांचा भाजपवर हल्लाबोल)

कोल्हापूरात बूथ कार्यकर्त्यांशी बोलताना मोदींनी इव्हीएम मशीनवरुन सुरु असलेल्या वादावर वक्तव्य केले. तसेच विरोधीपक्षाकडून आताच लोकसभा पराभवासाठी कारणे शोधण्या व्यस्त झाले आहेत. तर इव्हीएमला खलनायक म्हणून संबोधत आहेत. प्रत्येक पक्षाला जिंकण्याची इच्छा असते. परंतु जनतेकडून काहीच पक्षांना आशिर्वाद दिले गेल्याने ते अशा पद्धतीने वैतागतात. त्यामुळेच विरोध पक्ष प्रत्येक वेळी रंग बदलत असल्याची टीका मोंदीनी केली आहे.