मावळ लोकसभा मतदारसंघातून आर आर पाटील यांच्या कन्या स्मीता पाटील-थोरात यांना राष्ट्रवादीचे तिकीट?

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही या पक्षाचे बऱ्यापैकी बस्तान आहे. असे असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघातून गेले दोन वेळा शिवसेनेचा उमेदवार निवडूण आला आहे. पंधराव्या लोकसभेसाठी( २००९-२०१४) गजानन बाबर तर, सोळाव्या लोकसभेसाठी (२०१४) श्रीरंग बारणे हे शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत.

smita rr patil | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Maval Lok Sabha constituency: आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2019) मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू पार्थ पवार (Parth Pawar) हे निवडणूक लढवणार अशी चर्चा रंगली होती. ही चर्चा रंगली असतानाच आता आर आर पाटील (RR Patil) यांच्या कन्या स्मीता पाटील-थोरात (Smita Patil-Thorat) यांचेही नाव चर्चेत आले आहे. दरम्यान, मावळमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा अद्यापपर्यंत तरी विचार केला नसल्याचे स्मीता पाटील-थोरात यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्यातरी या चर्चेला काहीसा विराम मिळाला आहे. मात्र, प्रत्यक्ष उमेदवार निवड केली जाताना आबांच्या (आर आर पाटील) कन्येचे नाव पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकते अशी चर्चा आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी तागद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही या पक्षाचे बऱ्यापैकी बस्तान आहे. असे असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघातून गेले दोन वेळा शिवसेनेचा उमेदवार निवडूण आला आहे. पंधराव्या लोकसभेसाठी( २००९-२०१४) गजानन बाबर तर, सोळाव्या लोकसभेसाठी (२०१४) श्रीरंग बारणे हे शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघात दोन्ही वेळेस माजी महापौर आझम पानसरे व राहुल नार्वेकर यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपले पूत्र पार्थ पवार यांना या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सूरु केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून आले होते. मात्र, मी आणि सुप्रीया सुळे यांच्याव्यतिरिक्त पवार कुटुंबातील कोणीही लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पार्थ पवार यांच्या नावाच्या चर्चेवर पडदा पडला. त्यामुळे मावळमधून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: प्रिया दत्त करणार कमबॅक, निवडणूक लढण्याचे दिले संकेत; खा. पूनम महाजन यांच्यासमोर तगडे आव्हान)

दरम्यान, मावळमधून लढण्याचा आपला कोणताही विचार नाही. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार जो आदेश देतील तो आपल्याला मान्य आहे. आपल्यावर जबाबदारी टाकली तर आपण मागे हटणार नाही, असे स्मीता पाटील-थोरात यांनी स्पष्ट केले आहे. तर, दुसऱ्या बाजूला समोर कोणत्याही पक्षाचा उमेदवार असला तरी, आपल्याला फरक पडणार नाही. आपला जनसंपर्क चांगला आहे. ओळख निर्माण करण्यासाठी माला बॅनरबाजी करण्याची गरज नाही, असे सांगत आगामी निवडणुकीबाबत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे.