भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) भाजप (BJP) पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा सोशल मीडियावर प्रचंड पसरली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात मोदी पाकिस्तान (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) ह्याच्या सोबत जेवणाचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीवर लक्ष दिले असता सध्या राजकीय पक्षांकडून सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक केला जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटोत मोदी आणि इम्रान खान यांचा एक फोटो प्रचंड लोकांनी पोस्ट केला आहे. त्यामध्ये दोन्ही देशाचे पंतप्रधान एकत्र जेवणाचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत. तर नेटकऱ्यांनी आपापल्या परीने या फोटोचा अर्थ काढला आहे. तर लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने पक्ष आणि नेता विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करत आहेत.(हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होईल: इम्रान खान)
फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये दोघे एकत्र दिसून येत आहेत. तसेच मोदी यांनी हिरव्या रंगाची टोपी घातलेली सुद्धा लगेच कळून येत आहे.
#PTI Chief Imran Khan wth wife Reham Khan, at Sehri in #Karachi via @Samarjournalist pic.twitter.com/hYa9o8DaTR
— Khalid khi (@khalid_pk) July 5, 2015
सुजीत यादव नावाच्या व्यक्तीने हा फोटो पोस्ट करुन असे लिहिले आहे की, हिरव्या रंगातील टोपीमधील मौलाना ओळखीचे दिसून येत आहेत. ही पोस्ट आतापर्यंत 3200 वेळा व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया या फोटोवर दिल्या आहेत.
परंतु एक्सपर्ट यांनी असा दावा केला आहे की, सोशल मीडियात व्हायरल झालेला मोदी यांचा फोटो खोटा आहे. फोटोशॉपच्या माध्यमातून त्याचे एडिटिंग करण्यात आले असून फोटोत मोदी नाहीच आहेत. तर इम्नान खान यांच्यासोबत त्यांची अगोदरची पत्नी रेहमान खान आहे. 6 जुलै 2015 रोजीचा फोटो असून कराची मधील पाकिस्तानी नेता फैसल वावडा यांच्या घरातील असल्याचे सांगितले जात आहे. तर मोदी यांचा फोटो इम्रान खान यांच्यासोबत लावण्यात आला आहे तो 2013 मधील आहे. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गांधीनगर येथे पत्रकारांसोबत जेवण करत असल्याचे सांगण्यात येत आहे.