दिल्ली विधानसभा निवडणूक निकालांमध्ये आप पक्षाच्या पारड्यामध्ये मतदारांनी पुन्हा कौल टाकला आहे. 8 फेब्रुवारी दिवशी दिल्लीमध्ये झालेल्या मतदानानंतर आज सकाळ पासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. 70 जागांपैकी 63 जागांवर आप आघाडीवर आहे तर 7 जागा भाजपाच्या पारड्यात आल्या आहे. दरम्यान यंदादेखील आपचा बोलबाला कायम राहिला आहे. आप नेते अरविंद केजरीवाल सलग तिसर्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या तयारीमध्ये आहेत. दरम्यान पटपड़गंजमधून आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पुन्हा आमदार झाले आहेत तर त्यांच्यासोबतच राघव चड्ढा, इमरान हुसेन, सौरभ भारद्वाज आणि राज कुमारी ढिल्लन यांनी देखील बाजी मारली आहे. Delhi Assembly Election Results 2020: अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्ष दिल्ली विजयाची 5 महत्त्वाची कारणे.
आपचे 63 उमेदवार तर भारतीय जनता पक्षाचे 7 उमेदवार विजयी ठरले आहेत. दरम्यान आप उमेदवारांचं कौतुक करताना अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा विधानसभा निवडणूक 2020 चा निकाल हा नव्या राजकारणाला जन्म देणारा आहे. असं म्हटलं आहे. तर भाजपाला अपेक्षेप्रमाणे दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये यश न मिळाल्याने पराभवाचं चिंतन करू असं भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे. 'दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाने दिला नव्या राजकारणाला जन्म' आप नेते अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया.
'आप' विजयी उमेदवारांची यादी
'भाजप' विजयी उमेदवारांची यादी
दिल्लीमध्ये विजयी उमेदवारांवर देशभरातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवासीयांनी देश 'जनता की बात' ने चालतो, 'मन की बात' नव्हे असे म्हणत भाजपाला टोला लगावला आहे. तर एनसीपी प्रमुख शरद पवार यांनी आता भाजपाच्या पराभवाची मालिका सुरू झाली आहे. दरम्यान दिल्लीमध्ये आपच्या विजयाचं आश्चर्य वाटत नसल्याचं मत व्यक्त करत आप नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. तर विजयानंतर आपचे अरविंद केजरीवाल यांनी देखील आता दिल्लीवासीयांच्या साथीने अधिक विकास करणार असल्याचं म्हटलं आहे.