भोपाळ लोकसभा मतदारसंघ: भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या जीवनावरील Documentary अल्पावधीतच होणार प्रदर्शित
साध्वी प्रज्ञा ठाकुर (Photo Credits- IANS)

Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणूक 2014 मध्ये भोपाळ लोकसभा मतदारसंघ (Bhopal Lok Sabha constituency) येथून निवडणूक लढवत असलेल्या भाजप उमेदवार (BJP candidate) प्रज्ञा सिंह ठाकुर (Pragya Singh Thakur) यांच्यावर आधारीत एक डॉक्यूमेंट्री (Documentary) तयार करण्यात आली आहे. ही डॉक्युमेंट्री आज (1 एप्रिल 2019) किंवा उद्या (2 एप्रिल 2019) युट्यूबवर लॉन्च केली जाऊ शकते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 18 मिनीटांच्या या डॉक्युमेंट्रीमध्ये कथीत हिंदू दहशतवाद ते यूपीए (UPA) सरकारची धोरणे याविषयीची मांडणी करण्यात आली आहे. खास करुन प्रज्ञा सिंह यांच्यावर असलेल्या आरोपांबाबत प्रामुख्याने या डॉक्युमेंट्रीमध्ये भाष्य करण्यात येऊ शकते.

या डॉक्युमेंट्रीत दावा करण्यात आला आहे की, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या टॉर्चरच्या आरोपांची चौकशी करण्यात आलेले राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे ते लोक होते जे साध्वीवर अत्याचार करण्यात सहभागी होते. एनडीटीव्ही हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, या डॉक्युमेंट्रीमध्ये हिंदू किंवा भगवा दहशतवाद याविषयी यूपीए सरकारमध्ये कशा पद्धतीने वातावरण तराय करण्यात आले याबाबतचाही पर्दाफाश करण्यात येणार आहे. समझोता एक्सप्रेस आणि मक्का मशीद बॉम्बस्फोट आदी मुद्द्यांवरुन कशा पद्धतीने वातावरण निर्मिती करण्यात आली यावरही या डॉक्युमेंट्रीत भाष्य करण्यात आले आहे.

सांगितले जात आहे की, हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावर आरएसएस आणि इतर हिंदुत्त्ववादी नेत्यांना कशा पद्धतीने जाळ्यात ओढण्यात आले याबाबत ही या डॉक्युमेंट्रीमध्ये भाष्य करण्यात आले. ही डॉक्युमेंट्री आरएसएस च्या इंद्रप्रस्थ विश्व संवाद केंद्र द्वारा बनवविण्यात आली आहे. उल्लेखनीय असे की, भोपाळ येथून साध्वी प्रज्ञा सिंह यांना निवडणूक तिकीट देण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका मोठी निर्णायक ठरल्याचे म्हटले बोलले जात आहे. (हेही वाचा, उमा भारती यांच्या भेटीदरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अश्रूंचा बांध फुटला (Video))

भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह मैदानात आहे. त्यामुळे दिग्विजिय सिंह विरुद्ध प्रज्ञा सिंह ठाकूर असा सामना मोठा उत्सुकतापूर्ण आहे. दिग्विजय सिंह हे काँग्रेस नेते आहेतच पण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर टीकाकारही आहेत. मुंबई दहशतवादी हल्ला (26/11) हा सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला होता. त्यामुळे भोपाळ येथील लोकसभा निवडणूक जोदरादर चर्चेचा विषय ठरली आहे.