'महासंवाद' कार्यक्रमामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला जवानांच्या कामगिरीला सलाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो सौजन्य-ANI)

भारत(India) पाकिस्तान (Pakistan) मधील सध्याची परिस्थिती पाहता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मात्र भारतीय जवनांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.भारतीय जवान हे देशातच नव्हे तर देशाबाहेर जाऊन आपली कामगिरी यशस्वीपणे बजावत असल्याचा आनंद मोदी यांनी भाजप (BJP) 'महासंवाद' कार्यक्रमातून व्यक्त केला आहे. त्याचसोबत संपूर्ण देश एक असून सर्वजण जवानांसोबत उभे असल्याचा आत्मविश्वास मोदी यांनी या कार्यक्रमादरम्यान दिला आहे.

महासंवाद कार्यक्रमाच्या वेळी मोदी यांनी जनतेला संबोधित करताना आपण सगळे भारताचे नागरिक आहोत असे म्हटले आहे. त्यापुढे आपले जवान रात्रंदिवस सीमेवर पाहारा देत आपल्या सुरक्षिततेबाबत सर्तक राहत असतो. मात्र देशाच्या समृद्धी आणि शांततेसाठी दिवस-रात्र एक करुन काम करावे लागणार असल्याची आपली जबाबदारी असल्याचे मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.(हेही वाचा- संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांचा मोठा निर्णय; 2700 कोटींची शस्त्रे खरेदीला तातडीची मंजुरी)

तर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय कमांडरची लवकरच सुटका होण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.तसेच जम्मू-काश्मिर मधील पुलवामा हल्ल्याचे पुरावे बुधवारी भारताने पाकिस्तानकडे देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.