Phethai Cyclone: आंध्र प्रदेशात 'फेथाई'च्या चक्रीवादळाचा तडाखा, स्थानिकांचे मोठ्या संख्येने स्थलांतर
Phethai Cyclone (Photo Credits: Twitter)

Phethai Cyclone: बंगालच्या उपसागरामध्ये 'तितली' आणि 'गज' चक्रीवादळानंतर आता 'फेथाई' (Phethai Cyclone) वादळ येऊन धडकले आहे. या वादळाचा फटका आंध्र प्रदेशाला (Andhra Pradesh) बसला असून विशाखापट्टणम मध्ये मोठ्या संख्येने झाडांचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 11,000 स्थानिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

हवामान विभागाने 16 ते 19 डिसेंबर रोजी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि छ्त्तीसगड येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशाचा काही भागात मुसळधार पाऊस पडत असून ताशी 90 किमी वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. तर किनारपट्टीवरील मच्छिमारांना सतर्कतेचा इशादा देण्यात आला आहे.

'फेथाई' चक्रीवादळाने आंध्र प्रदेशाला तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या असून प्रशासनाने हायअलर्ट जाहीर केले आहे.