गुजरात सरकारकडून महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांनी कोविड19 चे निगेटिव्ह रिपोर्ट्स सोबत आणण्याचे अनिवार्य केले आहे. तर 72 तासांपूर्वीच्या चाचणीचे रिपोर्ट्स ग्राह्य धरले जाणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातून गुजरात मध्ये आलेल्या बहुतांश जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळेच आता महाराष्ट्रातून गुजरातमध्ये येणाऱ्यांना स्क्रिनिंगला सामोरे जावे लागणार आहे. (COVID-19 Vaccine: मोठा निर्णय, 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे होणार कोरोना लसीकरण; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती)
आरोग्य विभागाचे उपसचिव वनराज सिंह पाधियार यांनी जाहीर केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातून गुजरात मध्ये आलेल्या लोकांना परवानगी असणार. परंतु 72 तासांपूर्वीचे कोविड19 चे निगेटिव्ह रिपोर्ट्स सोबत असणे बंधनकारक असणार आहे. (International Flights: आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी 30 एप्रिलपर्यंत वाढवली; कोरोनाच्या उद्रेकामुळे DGCA चा निर्णय)
दरम्यान, देशातील महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगढ आणि गुजरात मध्ये कोरोनाचे दरदिवशी नव्याने 77.44 टक्के रुग्ण आढळत असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. तर महाराष्ट्रात दिवसाला सर्वाधिक (28,699) रुग्ण आढळून येत आहेत. तर पंजाब मध्ये 2256 आणि कर्नाटकात 20210 रुग्ण आढळून येत आहेत. तर देशात गेल्या चोवीस तासात 47,262 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच 275 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 23,907 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला आहे.
तसेच सर्वत्र सध्या कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. अशातच कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोस घेण्यासाठी 4 ते 8 आठवड्यांचा अवधी ठेवण्यात यावा. पहिल्यांदा हेच आंतर 4 ते 6 आठवडे इतका होता. याचा अर्थ राज्य सरकार केंद्र सरकारच्या नव्या सूचनांनुसार 4 ते 8 आठवड्यांमध्ये कोविशील्ड वॅक्सीन चा दुसरा डोस देऊ शकतात असे केंद्राने राज्य सरकारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.