बिहारमध्ये रस्ते अपघातात एका दिवसात 8 जणांचा बळी
प्रतिकात्मक फोटो

बिहारमध्ये एका दिवसात रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना घडली आहे. काल रात्री पासून चालू झालेल्या या अपघाताचे सत्र भरदिवसासुद्धा पाहायला मिळाले आहे. तर या घटनेतील खूप जणांना गंभीर दुखापत झाल्याचेही सांगितले जात आहे.

बिहारमधील पटना येथे काल रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन मोटरसायकलींची एकमेकांना धडक लागून अपघात झाला होता. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यातील एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर त्याच रात्री गरब्याचा कार्यक्रम संपल्यावर घरी येण्यास निघालेली तेथील गायिका आणि तिच्या दोन भावंडांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तसेच ट्रक आणि वाहनाच्याखाली जाऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याने बिहारसाठी गुरुवारचा दिवस वाईट ठरला आहे.

या अपघातात मृत पावलेल्या नातेवाईकांवर रुग्णालयात उपचार चालू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.