Roman Babushkin: पाकला शस्त्रास्त्रपुरवठा करण्याची बाब भारताच्या संवेदनशिलतेवर अवलंबून- रोमन बाबुश्किन
Roman Babushkin | (Photo Credits-ANI)

पाकिस्तानला संरक्षण शस्त्रास्त्रपुरवाठा करण्याची बाब जेव्हा येते तेव्हा ती भारताकडून होणाऱ्या विनंती आणि संवेदनशीलतेवर अवलंबून असते असे उद्गार रशियन मिनशनचे मुख्य प्रमुख (Russian Deputy Chief of Mission in Delhi रोमन बाबुश्किन (Roman Babushkin) यांनी काढले आहेत. रोमन बाबुश्किन यांनी मंगळवारी अशी आशा व्यक्त केली की भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश चर्चेतून मार्ग काढतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात विविध विषयांवर एससीओमध्ये एकत्र काम केल्यावर, त्यांच्या बाजूने द्विपक्षीय चर्चेसाठी पुरेसा विश्वास निर्माण करता येईल.

रोमन बाबुश्किन यांनी पुढे बोलताना सांगितले की, भारत आणि पाकिस्तान हे एससीओमध्ये (Shanghai Cooperation Organisation) नुकतेच सहभागी झाले आहेत. ज्यात रशीया, चीन यांच्यासह अशीया खंडातील इतर चार देश पहिल्यापासूनच समाविष्ट आहेत. रोमन बाबुश्किन यांनी मंगळवारी अशी आशा व्यक्त केली की भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश चर्चेतून मार्ग काढतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात विविध विषयांवर एससीओमध्ये एकत्र काम केल्यावर, त्यांच्या बाजूने द्विपक्षीय चर्चेसाठी पुरेसा विश्वास निर्माण करता येईल.

दरम्यान, रोमन बाबुश्किन यांनी सागितले की, भारत आणि चीन यांच्यातील चर्चेला रशिया प्रोत्साहन देतो. परंतू, उभय देशांनी निमंत्रण दिल्याशिवाय आम्ही उभय देशांच्या प्रश्नांमध्ये मध्यस्थी करणार नाही. दोन्ही देशांमध्ये जी चर्चा सुरु आहे त्यात रशियाचा कोणताही सहभाग नसल्याचेही बाबुश्किन यांनी सांगितले. (हेही वाचा, India-China Tensions: भारतीय लष्कराने LAC पार केल्याचा चीनचा दावा; लदाख मध्ये Pangong Tso Lake जवळ 'Warning Shots' झाडल्याचादेखील आरोप)

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे एससीओच्या बैठकीसाठी रशिया दौऱ्यावर आहेत. प्रसारमाध्यमांनी शक्यता वर्तवली आहे की, या बैठकीत एस. जयशंकर हे या बैठकीत वांग यी यांच्याशी द्वपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे.