Drunk Man's Misbehaviour With Woman in Train: मद्यधुंद व्यक्तीकडून Visakha Express ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेशी गैरवर्तन, पीडिता जखमी
त्यामुळे तोल जाऊन ती खाली पडल्याचा आरोप पीडितेने केला आहे. विशाखा एक्स्प्रेस (Visakha Express) मिर्यालागुडा रेल्वे स्टेशन (Miryalaguda Railway Station) ओलांडत असताना ही घटना मंगळवारी (9 जुलै) घडली.
तेलंगणातील (Telangana) मिरयालगुडा येथील एक 25 वर्षीय महिला रेल्वेतून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. एका मद्यधुंद व्यक्तीने ट्रेनमध्ये चढताना तिच्यासोबत गैरवर्तन (Misbehaviour With Woman) केले. त्यामुळे तोल जाऊन ती खाली पडल्याचा आरोप पीडितेने केला आहे. विशाखा एक्स्प्रेस (Visakha Express) मिर्यालागुडा रेल्वे स्टेशन (Miryalaguda Railway Station) ओलांडत असताना ही घटना मंगळवारी (9 जुलै) घडली. दरम्यान, या घटनेमध्ये महिलेशी कथीतपणे गैरवर्तन करणारा 30 वर्षाचा व्यक्तीही स्लीपर कोचवरून पडला. त्यामुळे त्याला दुखापत झाली. सरकारी रेल्वे पोलिस (Government Railway Police) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही व्यक्तींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सुरक्षित असल्याची माहिती आहे.
पीडिता खासगी शाळेत शिक्षिका
हैदराबादमधील एका खाजगी शाळेत शिक्षिका असलेली ही महिला मंगळवारी सिकंदराबाद येथे ट्रेनमध्ये चढल्यानंतर आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथे एकटीच जात होती. वॉशरुमजवळ हात धुवून परतत असताना कोचच्या दाराजवळ उभ्या असलेल्या मद्यधुंद व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. ज्यामुळे दोघेही खाली पडल्याचा आरोप तिच्या पतीने पोलिसांत केला. आगगाडी. आणखी एका जीआरपी अधिकाऱ्याने सांगितले की, काही प्रवाशांकडून घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना वेगळ्या रुग्णालयात नेले. (हेही वाचा, Fake Job Scam in Maharashtra: नोकरी घोटाळा, तोतया RPF जवानास अटक; खोटी नाकरी, खोटे प्रशिक्षण)
आरोपीने गैरवर्तन केले नसल्याची पोलिसांची माहिती
दरम्यान, रेल्वे पोलीस म्हणाले की, आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीने महिलेशी गैरवर्तन केले नसल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात दावा केला की, ट्रेनने अचानक ब्रेक लावल्याने त्याने तिला पकडले आणि अचानक धक्का लागला. ज्यामुळे दोघेही खाली पडले. हा माणूस मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटल आहे.
विशाखा एक्सप्रेस दैनिक ट्रेन
दरम्यान, सिकंदराबाद (SC) ते भुवनेश्वर (BBS) ला विशाखा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेच्या मालकीची दैनिक एक्सप्रेस ट्रेन आहे. ट्रेनचे क्रमांक 17015 आणि 17016 आहेत. ही दक्षिण मध्य रेल्वे झोनचा भाग आहे. ट्रेन क्रमांक 17016 सिकंदराबाद येथून दुपारी 4:50 वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3:25 वाजता भुवनेश्वरला पोहोचते. ट्रेन क्रमांक 17015 भुवनेश्वर येथून 08:4 वाजता सुटते. दरम्यान, सन 2008 मध्ये याच नावाचा तेलगू चित्रपटाने तो मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला होता. ही ट्रेन नलगोंडा, मिर्यालागुडा, नदिकुडी, पिडुगुरल्ला, सॅटेनापाल गुंटूर जंक्शन, विजयवाडा, गुडिवडा, कैकालुरू, अकिविदु, भिमावाराम टाउन, तानुकू, तानुकु, एलाक्लु, एलाकुंदी अडा, विशाखापट्टनम, सिंहाचलम , कोठावलसा, विझियानगरम, चिपुरुपल्ली, पोंडुरू, श्रीकाकुलम रोड, तिलारू, कोटाबोमाली, नौपाडा, पलासा, सोमपेटा, इच्छापुरम, ब्रह्मपूर, छत्रपूर, बालुगाव, निराकारपूर, आणि खुर्दा रोड ते भुवनेश्वर आदी स्टेशनांवरुन धावते.