उत्तराखंड: शाळेची बस दरीत कोसळून 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू, बचावकार्य सुरु
Uttarakhand Bus Accident (Photo Credits-ANI)

उत्तराखंड (Uttarakhand)  येथे एका शाळेची बस दरीत कोसळून 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शाळेच्या बसमध्ये एकूण 18 विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

एनडीआरफच्या पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृत विद्यार्थ्यांबद्दल दुख व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराची अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.(धक्कादायक! विद्यार्थ्यांना समजावे म्हणून शिक्षकांनी वर्गातच दाखवले बलात्काराचे प्रात्यक्षिक; गुन्हा दाखल)

अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर मृत विद्यार्थ्यांची ओळख अद्याप पटली नसून याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. तसेच स्थानिक नागरिकसुद्धा एनडीआरफच्या जवानांना बचावाकार्यात मदत करत असल्याचे सांगण्यात येत आहे.