Uttar Pradesh: पत्नीला बेरोजगार नवऱ्याला प्रति महिना Maintenance Allowance म्हणून द्यावे लागणार 1 हजार रुपये; युपी फॅमिली कोर्टाने दिले आदेश
Court Hammer | (Photo Credits-File Photo)

हिंदू विवाह कायद्यात महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले गेले आहे. तर महिलांच्या त्रासाला कंटाळलेल्या पतीच्या हितासाठी ही काही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुजफ्फरनगर मध्ये फॅमिली कोर्टाने (Family Court) मंगळवारी अशाच पद्धतीचा एक आदेश पारित केले आहे. ज्यामध्ये पेन्शन मिळणाऱ्या पत्नीला आपल्या बेरोजगार नवऱ्याला देखभाल भत्ता द्यावा लागणार आहे. हा भत्ता 1 हजार रुपये प्रति महिना असणार असल्याचे ही कोर्टाने आदेश दिले आहेत.(Muslim Cop Suspended Over a Beard in UP: उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम पोलीस कर्मचारी निलंबीत; परवानगी न घेता दाढी राखल्याचा ठपका)

अॅडव्होकेट बालेश कुमार तायल यांच्या नुसार, खतौली मधील स्थानिक रहिवासी किशोरीलाल याने 1990 मध्ये कानपुर येथील मु्न्नी देवी हिच्यासोबत विवाह केला होता. मुन्नी देवी ही संरक्षण संशोधन विकास संस्था कानपूर येथे चतुर्थ श्रेणीत कर्मचारी रुपात कार्यरत होती. लग्नानंतर काही वर्षांनी किशोरीलाल आणि मुन्नी यांच्यामध्ये वाद झाले. त्यानंतर किशोरीलाल हा खतौली येथे येऊन राहू लागला होता. त्याने 2013 मध्ये देखभाल भत्त्याची मागणी करत मुन्नी देवी हिच्या विरोधात फॅमिली कोर्टात एक याचिका दाखल केली. याच दरम्यान, मुन्नी देवी सेवानिवृत्त झाल्याने तिला दरमहा 12 हजार रुपये मासिक पेन्शन मिळण्यास सुरुवात झाली.

बेरोजगार किशोरीलाल याच्या याचिकेवर फॅमिली कोर्ट क्रमांक 2 तृप्ता चौधरी यांच्या न्यायालयात दखल घेतली गेली. न्यायालयाने किशोरीलाल याच्या देखभाल भत्त्याची याचिका स्विकार करत त्याची पत्नी मुन्नी देवी हिला नवऱ्याला प्रति महिना 1 हजार रुपये द्यावे लागणार असल्याचा आदेश सुनावला आहे.