साहेब! बायको दरवाजा बंद करुन लाठीकाठ्यांनी मारते, नवरदेवांची पोलिसांकडे धाव
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

साहेब! बायको घराचा दरवाजा बंद करु लाठीकाठ्यांनी मारहाण केल्याचा घटना यूपीची राजधानी लखनौ (Lucknow) येथे उघडकीस येत आहे. या प्रकरणी पीडित नवरदेवांनी चक्क पोलिसांत धाव घेतली आहे.

ठाकुरगंज येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याची बायको लाठीकाठ्यांनी मारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच नवऱ्याने बायकोकडून मार खाऊन न घेतल्यास ती घरातील नवऱ्याच्या आईला आणि बहिणाला मारहाण करायला लागते असे पीडित व्यक्तीचे पोलिसांना सांगितले आहे. तसेच लखनौमध्यील हा एकटा पीडित व्यक्तीनसून अजूनही काही नवऱ्यांसोबत अशा घटना सध्याच्या काळात घडल्या आहेत.

फैजुल्लागंज येथे राहणाऱ्या तरुणाचे त्याच्या बायकोसोबत गेले पाच महिने भांडण चालू होते. त्यामुळे ऐके दिवशी बायकोने या तरुणाला रात्रभर चोपले. त्यामुळे त्याचा हात निखळला गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तसेच या पीडित तरुणाच्या वृद्ध वडिलांशीही तिने गैरवर्तन केले आहे. लखनौमध्ये दिवसेंदिवस नवऱ्याला मारण्याचा घटनाक्रम वाढत चालला आहे. त्यामुळे 2018 मध्ये आजवर 41 पीडित नवरदेवांची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.