Best Company To Work in India: TCS भारतात  काम करण्यासाठीची उत्तम कंपनी; LinkedIn चा रिपोर्ट
TCS | TCS (Photo Credits : TCS / Facebook)

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस अर्थात TCS ही भारतातील काम करण्यासाठीची सर्वोत्तम संस्था असल्याचा अहवाल समोर आला आहे. यंदाच्या वर्षात TCS च्या खालोखाल Amazon आणि Morgan Stanley चा समावेश असल्याचं LinkedIn च्या रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आलं आहे. पहिल्यांदाच Dream11, Games24x7 या कंपन्यांचा देखील त्यामध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे देशामध्ये आता गेमिंगची वाढती लोकप्रियता आणि या क्षेत्राचं अस्तित्त्व महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

काम करण्यासाठी उत्तम कंपनींच्या यादीमध्ये आता नवनव्या कंपन्यांचा समावेश झाला आहे. 25 पैकी 17 कंपन्यांनी या यादीत पदार्पण केले आहे, जे भारताच्या व्यवसाय परिसंस्थेतील मजबूत गती दाखवते. Zepto ही कंपनी 16 व्या स्थानी आली आहे. त्यांनी यावर्षी टॉप कंपनीच्या यादीत स्थान मिळवले आहे. नक्की वाचा: Tata Consultancy Services ने फोर्ब्सच्या 'अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट मोठ्या नोकरदारांच्या' यादीत केला प्रवेश.

"या अनिश्चित वातावरणात, नोकरदार मंडळी करिअरच्या वाढीसाठी काम करण्यासाठी कंपन्यांचे मार्गदर्शन शोधत आहेत आणि त्यांना दीर्घकालीन यशासाठी मदत करतील अशा कंपनीला प्राधान्य देत आहेत." 2023 च्या यादी मध्ये प्रभावी कार्यक्षमतेवर, आणि रिसॉर्सेसवर भर देऊन नोकरदारांना नव्या नोकरीच्या संधी मिळवण्यास मदत मिळवण्यावर भर दिला आहे. अशी माहिती Nirajita Banerjee,LinkedIn Career Expeer and India Managing Editor यांनी दिली आहे.

टेक कंपनी मध्ये आलेला शिफ्ट पाहता त्याचा परिणाम कंपनीच्या क्रमांकावरही झाला आहे. त्यामध्ये प्रोफेशनल सव्हिसेस, मॅन्युफेक्चरिंग आणि गेमिंग फीचरिंग यांचा समावेश आहे. मागील वर्षी फायनांशिअल सर्व्हिस, ऑईल अ‍ॅन्ड गॅस,प्रोफेशनल सर्व्हिसेस, मॅन्युफॅक्चरिंग आणि गेमिंग फिचरिंगचा समावेश आहे.

25 पैकी 10 कंपन्यांमध्ये फायनांशिअल सर्व्हिसेस, बॅंकिंग, फिंटेक कंपनी ज्यामध्ये Macquarie Group, HDFC Bank, Mastercard आणि Yubi यांचा समावेश आहे. सध्या ए आय, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि कम्युटर सिक्युरिटी अशा स्किलशी निगडीत टॉप कंपन्यांचा समावेश आहे.