Sushant Sing Rajput Death Case: सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मी नव्हे तर तपासणीला करण्यात आले Quarantine, पटनाचे IPS विनय तिवारी यांची BMC वर खोचक टीका
Vinay Tiwari (Photo Credits-ANI)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येप्रकरणी तपास कमी आणि दोन राज्यातील पोलिसांमधील चढाओढच अधिक पहायला मिळत आहे. याच कारणास्तव पटना येथून मुंबईत दाखल झालेल्या पोलिसांच्या टीमला मोकळ्या हाताने पुन्हा आपल्या राज्यात यावे लागले आहे. कारण मुंबईत आल्यानंतर पटनाचे आयपीएस (IPS) अधिकारी विनय तिवारी (Vinay Tiwari) यांना क्वारंटाइन करण्यात आले. परंतु आता विनय तिवारी यांना बीएमसीकडून सोडण्यात आले आहे.क्वारंटाइनमधून मुक्तता झाल्यानंतर विनय तिवारी यांनी मुंबई पोलीस आणि बीएमसीवर खोचक टीका केली आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, त्यांना नव्हे तर सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सुरु असलेल्या तपासणीला क्वारंटाइन करण्यात आले होते. तसेच अशा पद्धतीमुळे तपासणीवरच परिणाम होत आहे.

दरम्यान, विनय तिवारी यांच्यामुळे बिहार आणि मुंबई पोलीस यांच्यामध्ये तल्खी अधिक वाढली आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी सुद्धा मीडिया समोर आपला राग व्यक्त केला आहे. त्यावेळी पांडे यांनी मुंबई पोलिसांच्या वागणूकीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई पोलीस आणि बीएमसीने तिवारी यांना फक्त क्वारंटाइन केले असून त्यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन केल्याचा दावा केला आहे. कारण काहीही असो परंतु या घटनेमुळे सुप्रीम कोर्ट सुद्धा खुश नसल्याचे दिसून आले आहे. कोर्टाने असे म्हटले होते की, अशा घटना जनतेच्या समोर योग्य संदेश देत नाहीत.(Sushant Singh Rajput Death Case: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात CBI ने रिया चक्रवर्ती, तिचे वडील, आई, भाऊ, मॅनेजरसह इतरांविरुद्ध FIR दाखल केला)

आता विनय तिवारी तर पुन्हा आपल्या राज्यात परतले आहे. पण ज्या उद्देशाने ते आले होते ते पूर्ण झालेले नाही. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयकडून तपास करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. FIR सुद्धा दाखल करण्यात आले असून चौकशी सुद्धा चालू केली आहे. त्याचसोबत शुक्रवारी ईडीकडून रिया चक्रवर्ती हिची सुद्धा बराच वेळ चौकशी करण्यात आली आहे.