सर्जिकल स्ट्राइक : भारतीय लष्कराने दोन वर्षांपूर्वी केलेल्या यशस्वी कारवाईचे व्हिडिओज
भारतीय सैन्याची शौर्यगाथा (Photo Credit- YouTube)

दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये (पीओके) हे दहशतवाद्यांचे तळ उद्भवस्त करुन टाकण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यावेळी देशातील धाडसी कमांडोंनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. पाकिस्तान विरुद्धच्या या कारवाईंचे नवे व्हिडिओज वृत्तसंस्था एशिअन न्यूज इंटरनॅशनलने (एएनआय) प्रसिद्ध केले आहेत.

या व्हिडिओत टार्गेट एरिया दाखवण्यात आला आहे. येथे दहशतवाद्यांनी दोन लॉन्च पॅड बनवले होते. तिथे जवळच पाकिस्तानी सैन्याची चौकी देखील होती. टार्गेट एरियावर हल्ला झाल्यावर तिथे दोन जबरदस्त स्फोट झाले. ते या व्हिडिओत स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत.

तर दुसऱ्या व्हिडिओत पाकिस्तानी सैन्याच्या चौकी जवळून दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर स्फोटामुळे दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त झालेले तळही पाहायला मिळत आहेत.

29 सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्टाईलकला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार हा दिवस साजरा करणार आहे. यासाठी 28 ते 30 सप्टेंबर या काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय?

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. पण सर्जिकल स्टाइक म्हणजे नेमकं काय? तर सर्जिकल स्टाइकमध्ये हल्ला हा शत्रूच्या क्षेत्रात घुसून केला जातो. त्यामुळेच हे फार जोखमीचे असते. त्याचबरोबर अधिक नुकसान होण्याची भिती असतेच. म्हणूनच खूप तयारी आणि अचून नियोजनाची गरज असते. लष्कराच्या स्पेशल फोर्सचे पॅराकमांडोज् ही कामगिरी पार पाडतात. त्यांच प्रशिक्षण खास त्यासाठी झालेलं असतं.

लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाने (मिलिटरी इंटेलिजन्स) शांतता काळात खास पद्धतीने माहिती मिळवलेली असते. या माहितीच्या आधारावर या कारवाईचा आराखडा तयार केला जातो. हल्ल्याचे नियोजन करतानाच सर्व परिणामांचा विचार करण्यात येतो. ही कारवाई रात्रीच्या वेळी केली जाते आणि प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते.