Ayodhya Verdict: सर्वोच्च न्यायालयाने अयोद्धा प्रकरणी पुर्नविचार याचिका फेटाळल्या
ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने राम जन्मभूमीवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या सार्या 18 पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत.
अयोध्या प्रकरणी राम जन्मभूमीवरून वादग्रस्त असलेल्या जमीनीवर नोव्हेंबर 2019 मध्ये निकाल सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत अयोद्धेतील वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचं सांगत मशिदीसाठी 5 एकर जागा देण्याचा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात आलेल्या सार्या याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत अयोद्धा खटला बंद केला आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने राम जन्मभूमीवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या सार्या 18 पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. Ayodhya Judgement: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर मात्र आम्हांला अपेक्षित निकाल आला नाही: मुस्लिम पक्षकार.
9 नोव्हेंबर दिवशी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना योद्धेतील वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचं म्हणताना आता रामलल्लांचे अस्तित्त्व न्यायालयाने मान्य केले आहे. तर अयोद्धेमध्ये 5 एकर जमीन मुस्लिमांना उपलब्ध करून देण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हा निर्णय सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी 5 न्यायमूर्तींसोबत दिला होता. त्यानंतर मुस्लिम समाजाकडून या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. Ayodhya Judgment: अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाचा ऐतिहासिक निर्णय; वादग्रस्त जमीन रामलल्लाची, मशिदीसाठी पर्यायी 5 एकर जमीन.
ANI Tweet
6 डिसेंबर 1992 मध्ये आयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर या अयोद्धा मधील वादग्रस्त जमीनीच्या प्रकरणाविषयी दिवानी आणि फौजदारी न्यायालयात अनेक खटले दाखल झाले. त्यातील भूहक्काबाबतचा वाद कायम चर्चेमध्ये होता.