लग्नाळूंना धक्का ! मुलांचं लग्नाचं वय कमी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
सुप्रीम कोर्ट (Photo Credits: File Photo)

भारतात मुलीचे लग्नासाठीचे वय 18 तर मुलाचे 21 वर्ष आहे. ठरवून दिलेल्या वयाआधी लग्न करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. अलिकडेच सर्वोच्च न्यायलयाने या संदर्भातील एक याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेत लग्नासाठी पुरुषाचे वय 18 वर्ष करण्याची मागणी केली होती. अशोक पांडे नावाच्या वकीलाने ही याचिका न्यायालयात दाखल केली होती.

देशात मतदानासाठी, सेनेत भरती होण्यासाठी 18 वर्षाची वयोमर्यादा आहे. मग लग्नासाठीचे वय 21 वर्ष का? ते कमी करुन 18 वर्ष करण्यात यावे, असे याचिकेत म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली असून अशोक पांडे नावाच्या वकीलावर 25000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सध्या लग्नासाठी मुलाचे वय 21 वर्षे तर मुलीचे वय 18 वर्षे असणे बंधनकारक आहे. अन्यथा असे लग्न बेकायदा मानले जाते.