Strongest Armies In The World: चीनकडे आहे जगातील सर्वाधिक शक्तिशाली सैन्य; जाणून घ्या भारताची स्थिती
Indian Army | Image Used for Representational Purpose only | (Photo Credit-PTI)

डिफेन्स वेबसाइट मिलिटरी डायरेक्टने (Military Direct) प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, चीनकडे (China) जगातील सर्वात जास्त सैन्यशक्ती (Strongest Armies) आहे. प्रचंड सैन्य बजेट असूनही अमेरिका 74 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. त्यानंतर रशिया 69 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे व 61 गुणांसह भारत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर फ्रान्स 58 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. ब्रिटननेही अव्वल-10 मध्ये स्थान मिळवत 43 गुणांसह तो 9 व्या क्रमांकावर आहे. वेबसाइटने नमूद केले आहे की, अमेरिका जगातील लष्करासाठी जास्तीत जास्त 732 अब्ज डॉलर्स खर्च करतो. यानंतर चीन दुसर्‍या क्रमांकावर असून 261 अब्ज डॉलर्स आणि भारत 71 अब्ज डॉलर्स खर्च करतो.

अर्थसंकल्प, सक्रिय आणि निष्क्रिय लष्करी जवानांची संख्या, हवाई, सागरी, भूगर्भ व आण्विक संसाधने, सरासरी वेतन आणि उपकरणे यांची संख्या यासह अनेक बाबींचा विचार केल्यानंतर 'लष्कराचे सामर्थ्य निर्देशांक' तयार करण्यात आला असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. अभ्यासानुसार, बजेट, सैन्य आणि हवाई आणि नौदल क्षमता यासारख्या गोष्टींवर आधारित गुणांद्वारे चीन पहिल्या क्रमांकावर आला आहे. मात्र, जगातील चौथ्या क्रमांकाच्या शक्तिशाली सैन्याने प्रथम क्रमांकाच्या सैन्याला पूर्वेकडील लडाखमध्ये प्रवेश करण्यापासून थांबवले. (हेही वाचा: महिलांच्या सुरक्षेबाबत भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, गुन्हेगारी घटनांना 'अशा' प्रकारे घालणार आळा; वाचा सविस्तर वृत्त)

या अभ्यासानुसार असे म्हणण्यात आले आहे की, जर एखादी लढाई झाली तर चीन सागरी लढाईमध्ये जिंकेल, अमेरिका हवाई युद्धामध्ये आणि रशिया जमीनीवरील लढाईमध्ये जिंकेल. अमेरिका 14,141 विमानांसह 4,682 रशियन आणि चीनच्या 3,587 विमानांवर विजय मिळवेल. जमिनीवरील युद्धात 54,866 वाहनांसह रशिया, 50,326 अमेरिकन आणि 41,641 चीनी वाहनांना मागे सारेल. त्याच वेळी, काल्पनिक समुद्री युद्धामध्ये 406 जहाजांसह चीन रशियाच्या 278 अमेरिका आणि भारताच्या 202 जहाजांवर विजय मिळवेल.