PM narendra Modi (फोटो सौजन्य - ANI)

Sri Lanka Releases Indian Fishermen: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौऱ्यादरम्यान श्रीलंकन सरकारने रविवारी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत 14 भारतीय मच्छिमारांची सुटका (Sri Lanka Releases Indian Fishermen) केली. सुटकेपूर्वी, शनिवारी पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्यात सविस्तर चर्चा झाली. ज्यामध्ये मच्छिमारांच्या अटकेवरही चर्चा करण्यात आली. दरम्यान, संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आम्ही मच्छिमारांच्या प्रश्नांवर चर्चा केली. या प्रकरणात मानवतावादी दृष्टिकोन ठेवून पुढे जावे लागेल, यावर आमचे एकमत झाले. आम्ही मच्छिमारांची तात्काळ सुटका आणि त्यांच्या बोटी परत करण्यावर भर दिला.'

श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी भारतीय मच्छिमारांना, अटक केल्याने तणाव निर्माण झाला आहे. 2025 च्या सुरुवातीपासून, श्रीलंकेच्या सैन्याने 119 भारतीय मच्छीमार आणि 16 मासेमारी बोटींना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे किनारी समुदायांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. चर्चेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, आम्हाला कळवण्यात आले आहे की श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी 11 मच्छिमारांना तात्काळ सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि येत्या काही दिवसांत आणखी काही मच्छिमारांना सोडले जाईल. (हेही वाचा - (हेही वाचा -BIMSTEC Summit: बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली बांगलादेशचे प्रशासक मोहम्मद युनूस यांची भेट)

पंतप्रधान मोदींना श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार -

पंतप्रधान मोदींना श्रीलंका मित्र विभूषणय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले, जो श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान केवळ भारताच्या श्रीलंकेला असलेल्या दृढ पाठिंब्याचे प्रतिबिंबित करत नाही तर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या वचनबद्धतेचे देखील प्रतिबिंबित करतो. (हेही वाचा - Pamban Bridge Inauguration: पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतातील पहिल्या उभ्या समुद्री पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन, पहा व्हिडिओ)

तथापी, शनिवारी दोन्ही नेत्यांनी पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि विकास सहकार्यासह विविध क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.  शनिवारी संध्याकाळी राष्ट्रपती दिसानायके यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ राज्य मेजवानीचे आयोजन केले होते. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी सांगितले की, या भेटीमुळे सहकार्याच्या संधी आणखी वाढतील आणि दोन्ही देशांमधील लोकांमधील मैत्री आणखी दृढ होईल.