Sonia Gandhi On TV Anchor's WhatsApp Chats: देशभक्तीची प्रमाणपत्रं वाटणाऱ्यांचे बुरखे फाटले; अर्णब गोस्वामी व्हायरल व्हाट्सअॅप चॅटवरुन सोनिया गांधी यांचा निशाणा

अर्णब गोस्वामी यांच्या व्हायरल झालेल्या कथीत व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणाचा दाखला देत सोनिय गांधी यांनी म्हटले की, नुकतीच एक आश्चर्यजनक आणि तितकीच गंभीर बाब पुढे आली आहे. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसोबत कशी छेडछाड आणि समझोता केला जात आहे. या घटनेतून जे लोक इतरांना राष्ट्रभक्ती, राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र वाटतात त्यांचा बुरखा कसा फाटला आहे ते दिसते.

Sonia Gandhi On TV Anchor's WhatsApp Chats: देशभक्तीची प्रमाणपत्रं वाटणाऱ्यांचे बुरखे फाटले; अर्णब गोस्वामी व्हायरल व्हाट्सअॅप चॅटवरुन  सोनिया गांधी यांचा निशाणा
Sonia Gandhi | (Photo Credit: Facebook)

देशभक्तीची प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचा बुरखा फाटला आहे, अशी जोरदार टीका करत राष्ट्रीय काँग्रेस (Congress) पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी 'रिपब्लिक टीव्ही' चे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या कथीत व्हॉट्सअॅप चॅटवरुन केंद्र सरकारव जोरदार हल्लाबोल चढवला आहे. काँग्रेस कार्यकारणीची (CWC) एक बैठक आज पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडताना म्हटले की, शेतकरी संघटनांसोबत केंद्र सरकारने अतिशय अहंकाराने चर्चा केली.

सानिया गांधी यांनी पुढे म्हटले की, एक आठवड्यात संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात जनहीताचा मुद्दा विचारात घेऊन चर्चा होणे आवश्यक आहे. जनहिताच्या मुद्द्यावर केंद्र सरकार किती सहमत होते आहे हे पाहावे लागेल केंद्रीय कृषी कायद्यांचा उल्लेख कर सोनिया गांधी यांनी आरोप केला की, शेतकऱ्यांचे आंदोलन कायम आहे. सरकार शेतकऱ्यांना चर्चेच्या नावाखाली ताटकळत ठेवत आहे. अत्यंत असंवेदनशिलता दाखवत आहे. (हेही वाचा, Assembly Election 2021: नितीन राऊत, मुकुल वासनिक यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी; विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज; सोनिया गांधी यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय)

सोनिया गांधी यांनी पुढे असेही म्हटले की, हे तर स्पष्ट आहे की, केंद्र सरकारने कृषी कायदे अत्यंत घाईगडबडीने मंजूर केले. त्यावर विचार करायला वेळही दिला नाही. आम्ही या कायद्याचा विरोध करतो कारण हा कायदा शेतकऱ्यांच्या मूलभूत अधिकारांनाच धक्का लावतो.

(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2021 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).