अमेठी: स्मृती ईराणी यांच्या सुरेंद्र सिंह नामक निकटवर्तीय कार्यकर्त्याची गोळी मारुन हत्या

मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार स्मृती ईराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा धक्कादायकरित्या पराभव केला. त्यामुळे त्या देशात जायंट किलर ठरल्या. या विजयानंतर स्मृती ईराणी यांनी अमेठीच्या जनतेने आपल्या विकासावर विश्वास ठेवला. त्यामुळेच अमेठीत कमळ फुलले असे सांगत अमेठीच्या जनतेचे आभार मानले.

स्मृती ईराणी यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता सुरेंद्र सिंह | (Photo Credit- ANI/PTI)

उत्त प्रदेश राज्यातील अमेठी ( Amethi)येथे भाजप खासदार स्मृती ईराणी (Smriti Irani) यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. सुरेंद्र सिंह (Surendra Singh) असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. तो जामो येथील बरौलिया गावातील रहिवासी आहे. अज्ञात इससमांनी सुरेंद्र यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी हजर होत तपासणी केली. गुन्हा नोंद केल्यावर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

सुरेंद्र सिंह हे आपल्या राहत्या घरातून सकाळच्या वेळी बाहेर पडत होती. दरम्यान, त्यांच्यावर गोळीबार झाला. प्राप्त माहितीनुसार, घराबाहेर पडत असलेल्या सुरेंद्र सिंह यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या काही लोकांनी गोळीबार केला. गोळीबारामुळे जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी लखनऊ येथे नेण्यास सांगितले. मात्र लखनऊ येथे घेऊन जात असतानाच सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. सध्या गावात पोलिस दलाचे जवान तौनात करण्यात आले आहेत. (हेही वाचा, नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी विक्रम भावे, संजय पुनाळेकर यांना मुंबईतून अटक)

अमेठी हा काँग्रेसचा पारंपरिक गढ म्हणून ओळखला जातो. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार स्मृती ईराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा धक्कादायकरित्या पराभव केला. त्यामुळे त्या देशात जायंट किलर ठरल्या. या विजयानंतर स्मृती ईराणी यांनी अमेठीच्या जनतेने आपल्या विकासावर विश्वास ठेवला. त्यामुळेच अमेठीत कमळ फुलले असे सांगत अमेठीच्या जनतेचे आभार मानले.