सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता, मच्छिमारांनी मासेमारेसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन
Rainfall | (Image used for representational purpose only) | (Photo Credits: pixabay)

महाराष्ट्रासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडल्याचे दिसून आले आहे. तसेच काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार असल्यास हवामान खात्याकडून त्या संदर्भात अलर्ट जाहीर करण्यात येतो. याच दरम्यान आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आजपासून ते 4 ऑगस्ट या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(Pune Rains: पुण्याच्या अनेक भागात पावसाची दमदार हजेरी)

सिंधुदुर्गातील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासह मच्छिमारांनी या कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे माहिती देण्यात आली आहे. तसेच उद्यापर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने पुढील 4-5 दिवसात मुंबईसह घाट आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचे आयएमडी यांनी स्पष्ट केले आहे.(Maharashtra Monsoon 2020: पुढील 4,5 दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती)

महाराष्ट्रात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाला सुरुवात झाल्याचे दिसून आले होते. तसेच तुफान चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला फटका बसला होता. तर आता साधरण 15 ऑगस्टनंतर अधिक पाऊस होणार असल्याची शक्यता यापूर्वी हवामान विभागाने वर्तवली होती. यामुळे सखोल भागात राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सावधानी बाळगण्याची गरज आहे.