SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! खातेधारकांनी 10 दिवसात 'हे' करा महत्वाचे काम
देशातील सर्वाधिक मोठी बँक एसबीआयने (SBI) आपल्या करोडो ग्राहकांसाठी अलर्ट जाहीर केला आहे.
देशातील सर्वाधिक मोठी बँक एसबीआयने (SBI) आपल्या करोडो ग्राहकांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. हा अलर्ट आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्यासंदर्भातील आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना या महिन्याच्या अखेर पर्यंत म्हणजेच येत्या 30 जून पर्यंत आपले आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्यास ग्राहकांना सांगितले आहे. असे न केल्यास तुमच्या समस्या वाढू शकतात असे ही बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कारण तुम्हाला त्यानंतर बँकेच्या सर्व सुविधांचा लाभ घेता येणार नाही आहे.
आधार कार्डला पॅन कार्ड करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सुद्धा सामान्य नागरिकांना सुचना दिली आहे. बजेटमध्ये एक नियमाचा निर्णय घेत केंद्र सरकारने आधार हे पॅन कार्डला लिंक करण्यास अनिवार्य केले आहे. यासाठी तुम्ही सुद्धा एसबीआयचे बँक खाते शिल्लक असलेल्या जून महिन्यातील दिवसात लिंक करा. एसबीआयकडून ट्विट करत याबद्दल माहिती देण्यात आली आहे.(Driving License ते Registration ची वैधता आता 30 सप्टेंबर पर्यंत ग्राह्य; MoRTH ची ट्वीट करत माहिती)
Tweet:
Income Tax Act च्या सेक्शन 139AA मध्ये क्लॉज 41 अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने आपले पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केले नसेल तर त्याचे पॅन कार्ड नियमानुसार काम करणे बंद करणार आहे. यामुळे पुढील महिन्यापासून ग्राहकांना कोणतीच समस्या उद्भवू नये म्हणून एसबीआयने आधार कार्डला आपले पॅन कार्ड लिंक करण्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने यंदाच्या वर्षातील बजेटमध्ये इन्कम टॅक्स कायद्यातील 23H च्या नावाने एक नियम लागू केला आहे. या नव्या नियमानुसार निश्चित करण्यात आलेल्या तारखेनुसार एखाद्या व्यक्तीने आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर त्याला दंड भरावा लागणार आहे. हा दंड 1 हजार रुपयांपर्यंत असू शकतो. या व्यतिरिक्त पॅन कार्ड बंद केले जाणार आहे. अशातच तुम्हाला एका मर्यादेनंतर बँकेच्या सेवांचा सुद्धा वापर करता येणार नाही आहे.