खुशखबर! RBI च्या रेपो रेटमध्ये पाचव्यांदा घसरण, लोनवरील व्याज दर घटल्याने गृहकर्ज, वाहनकर्ज स्वस्त होणार
File image of the Reserve Bank of India | (Photo Credits: PTI)

भारतीय रिजर्व्ह बँक ने आपल्या रेपो रेट ने 1.4 टक्क्यांवरून 0.24 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. म्हणजेच 5.40 टक्क्यांवरून 5.14 टक्के इतका आला आहे. केंद्रीय बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी समितीने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आता लोनवरील व्याज दरात देखील घट होणार आहे. ही बातमी नागरिकांसाठी दिलासादायक देणारी आहे. रेपो रेटमध्ये 0.24 टक्क्यांची घसरण होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र त्यावर अखेर केंद्रीय बँक समितीने हा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.

केंद्रीय बँकच्या मॉनिटरी पॉलिसी समितीची मंगळवारपासून बैठक सुरु झाली होती. त्यावर आज शिक्कामोर्तब करत समितीने हा महत्वपुर्ण निर्णय दिला. ही या वर्षाची रेपो रेट मध्ये झालेली पाचवी घसरण आहे. याआधी RBI ने यावर्षी 4 वेळा रेपो रेटमध्ये 1.10 टक्क्यांची घट केली होती. याआधी त्यांनी ऑगस्ट मध्ये 0.35 टक्क्यांची घट केली होती. त्यानंतर रेपो रेट 5.40 टक्क्यांवर गेला होता. त्यात आज पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये घट झाल्यानंतर हा दर 5.14 टक्क्यांवर आला आहे.

हेही वाचा-RBI ने सलग चौथ्यांदा केली रेपो दरात कपात; आता कर्ज घेणे झाले अजून सोपे, जाणून घ्या नवीन दर

केंद्रीय बँकेकडून असे सांगण्यात येत आहे, रेपो रेट कमी ठेवले जाईल, ज्यामुळे यात आणखी घसरण होऊ शकते. शेअर बाजाराला रेपो रेटमध्ये घट झालेले रुचले नसले तरीही लोनवरील व्याज दर कमी झाल्यामुळे नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. RBI चा रेपो रेट कमी करण्याचा फायदा ग्राहकांना लवकरच मिळणार आहे.