Ranbaxy चे माजी प्रवर्तक मालविंदर- शिविंदर सिंह यांना फसवणूक आणि चोरीच्या आरोपाखाली अटक
मालविंदर-शिविंदर सिंह (PHoto Credits-Twitter)

फार्मा कंपनी रॅनॅबॅक्सीचे माजी प्रवर्तक मालविंदर सिंह (Malvinder Singh) आणि शिविंदर सिंह (Shivinder Singh) यांना पोलिसांनी फसवणूक आणि चोरीच्य आरोपाखीली अटक केली आहे. शिविंदर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले आहे. शिविंदर यांना गुरुवारी दिल्ली येथून आणि मलविंदर यांना आर्थिक गुन्हे शाखेने रात्री उशिरा पंजाब येथून पकडले आहे. या दोन्ही भावंडावर फसवणूक आणि चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. शिविंदर यांच्यासोबत अन्य तीन जणांनासुद्धा अटक करण्यात आली आहे. या चोरांना मंदिर मार्गातील ईओडब्लू कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले त्यावेळी त्यांना अटक केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या डीसीपी वर्षा शर्मा यांनी असे सांगितले की, शिविंदर, सुनील गोडवानी, कवि अरोडा आणि अनिल सक्सेना यांना अटक केली आहे. आरोपींवर कायदा 409 आणि 420 अंतर्गत ताब्यात घेतले आहे. रेलीगेयर फिनवेस्ट यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. शिविंदर यांच्यावर 740 कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी कथित रुपात शिविंदर सिंह यांचा मोठा भाऊ मालविंदर सिंह याच्याबाबत अधिक तपास करत असून या प्रकरणी त्यांच्या सुद्धा सहभाग आहे.(HSBC बँकेच्या 10,000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात; जागतिक मंदीचा फटका)

तर ऑगस्ट महिन्यात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगविरोधी कायद्यासंबंधित रॅनबॅक्सी समूहातील माजी प्रचारक मालविंदर आणि शिविंदर सिंह यांच्या परिसरात छापेमारी केली होती. अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्यावर छापेमारी केली होती.ईडीकडून करण्यात आलेली ही कारवाई सिंह बंधूंच्या विरोधात आर्थिक  अनियमितता आणि त्यांच्या व्यवसायामधील घट याच्यासंबंधित जोडली जात आहे.