Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक, महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश
Election Commission of India (ECI). (Photo Credits: IANS)

ECI Announces Rajya Sabha Elections on 57 Seats: भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर निवडणुकीची (Rajya Sabha Elections) घोषणा केली आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 15 राज्यांतून राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या 57 जागांसाठी ही निवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील 6 जागांचाही समावेश आहे. महाराष्ट्राच्या कोट्यातून संजय राऊत (शिवसेना), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस), विनय सहस्त्रबुद्धे (भाजप), विकास महात्मे (भाजप) आणि काँग्रेसकडून पी. चिदंबरम यांचा कार्यकाळ संपत आहे.

कोणत्या राज्यात किती जागा?

उत्तर प्रदेश- 11जागा

आंध्र प्रदेश- 04 जागा

तेलंगाना- 02 जागा

छत्तीसगढ- 02 जागा

मध्य प्रदेश- 03 जागा

तामिळनाडू- 06 जागा

कर्नाटक- 04 जागा

ओडिशा- 03

महाराष्ट्र- 06 जागा

पंजाब-02 जागा

राजस्थान- 04 जागा

उत्तराखंड-01 जागा

बिहार- 05 जागा

झारखंड-02 जागा

हरियाणा-02 जागा

निवडणूक आयोगाने माहिती देताना म्हटले आहे की, या निवडणुकीसाठी 24 मे रोजी अधिसूचना निघेल. तर 31 मे ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. अर्जाची छाननी 1 जून रोजी केली जाईल. अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख 3 जून असेल. सर्व 57 जागांवर 10 जून रोजी सकाळी 9 वाजता मतदान होईल. 10 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होईल.