ऐन थंडीत दिल्लीला अवकाळी पाऊस आणि गारपीटांचा फटका! (Video)
Delhi Rain (Photo Credits- ANI)

राजधानी दिल्ली (Delhi) येथे ऐन थंडीच्या दिवसात पावसाने हजेरी लावली आहे. तर थंडीचे वातावरण असल्याने गारपीट (Hailstorm lashes) ही पावसासोबत पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सुभाष नगर येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली असून रस्तांवरुन पावसाच्या पाण्यासह गारीपट वाहताना दिसून येत आहे. तर दिल्लीच्या विविध भागात सकाळ पासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवरुन गाड्या धिम्या गतीने जात आहेत. सकाळी ऐन थंडीत दिल्लीकरांना पावसाचा पुन्हा एकदा आनंद घ्यायला मिळत आहे.

दिल्लीतील मंडी हाऊस मेट्रो स्टेशन,प्रल्हादपूर अशा विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. थंडीच्या दिवसात पावसामुळे धुक्याचे वातावरण झाले आहे. त्यामुळे वाहने सावधगिरीने चालवण्याचे अवाहान दिल्ली पोलिसांकडून वाहन चालकांना दिले जात आहे.