कोरोना व्हायरसचं संकट भारतासह जगभरात थैमान घालत असताना त्याला रोखण्यासाठी अनेकांना लॉकडाऊन सारखी कडक पावलं उचलावी लागली. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेसोबतच भारताच्या अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्था आणि आरोग्य क्षेत्रामधील तज्ञ मंडळींशी चर्चा केली आहे. यामध्ये आज त्यांनी भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासोबत चर्चा केली आहे. यावेळेस त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा त्यांनी रघुराम राजन यांच्याबरोबर अर्थव्यवस्थेसमोर असलेल्या आव्हानांची चर्चा केली.
रघुराम राजन यांनी विकेंद्रीकरण महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे सर्व सामान्यांना ताकद मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. निर्णय वेगळीकडून घेतला गेला तर तो योग्य दिशेनं पुढे सरकणार नाही. आज पंचायतसारख्या संस्थांना कमी अधिकार दिले आहेत. केंद्रीकरणामुळे निर्णय लवकर राबवले जाऊ शकत नाहीत, असे मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.
Congress पक्षाचं ट्वीट
LIVE: Shri @RahulGandhi in conversation with Dr. Raghuram Rajan on COVID19 & its economic impact. #RahulShowsTheWay https://t.co/azomUpU1eW
— Congress (@INCIndia) April 30, 2020
24 मार्च ते 14 एप्रिल या पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनचा देशावर अधिक परिणाम जाणवला नाही. भारतातील गोरगरिबांसाठी सुमारे 60 हजार कोटी पेक्षा अधिक रुपयांची गरज लागेल. पण भारताचा जीडीपी जवळपास 200 कोटी असताना ही किंमत खूपच कमी असल्याचं म्हटलं आहे. सध्या हा प्रश्न गरिबांच्या जीवाचा असेल तर हा खर्च व्हायला हवा, असेदेखील रघुराम राजन यांनी सुचवलं आहे.