Snooping Row: मोदी 'असुरक्षित हुकूमशहा' असल्याचे राहुल गांधीचे टीकास्त्र
Congress President Rahul Gandhi (Photo Credits: Getty Images)

आता आपल्या संगणकातील माहिती तपासण्याचे अधिकार केंद्रीय गृहमंत्रालयाने दहा तपास यंत्रणांना दिले आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली आहे. भारताचे 'पोलीस स्टेट' बनवून मोदी तुमच्या समस्या सुटणार नसून यावरुन तुम्ही किती असुरक्षित हुकूमशाह आहात हे सिद्ध होते, अशा शब्दात राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. सावधान! यापुढे तुमच्या कॉम्प्युटरवर सरकार ठेवणार नजर, पाहा काय होतील परिणाम?

मोदी सरकारच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षाकडूनही सडकून टीका झाली. हा निर्णय असंवैधानिक असून यामुळे सामन्य जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा येईल, असे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे.

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे मोबाईल, लॅपटॉपमधील तुमच्या खाजगी डेटा 10 एजन्सीज तपासू शकणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दहा संस्थांना प्रत्येक संगणकावर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मनमोहन सिंग सरकारने 2009 मध्ये केलेल्या कायद्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.