लोकसभा निवडणुक 2019: फक्त शाकाहारी लोकांनाच 'या' राजकीय पक्षाकडून मिळणार तिकिट
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Wikimedia Commons)

पिरामिड पार्टी ऑफ इंडियाने (Pyramid Party Of India) बुधवारी हिंदी भाषिकांच्या राज्यात आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचसोबत पार्टीने येत्या निवडणुकीत फक्त शाकाहारी असणाऱ्या उमेदवारांना जागा लढवण्यासाठी तिकिट देणार असल्याचे म्हटले आहे. पक्षाचे संस्थापक ब्रह्मर्षि पितामह पत्री यांनी असे सांगितले की, दक्षिण भारतात आम्ही प्रत्येक निवडणुकीत आमचे उमेदवार जागेसाठी उतरवले आहेत. मात्र आता उत्तर भारतात पक्षाचे बळ वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करत आहोत. त्याचसोबत पक्षाच्या संस्थापकांनी असे ही म्हटले आहे की, आमच्या पक्षाचा उमेदवार बनवण्यासाठी त्या व्यक्तीला ध्यानसाधना करण्याचे माहिती असावे. तसेच तो उमेदवार पूर्णपणे शाकाहारी असणे महत्वाचे आहे. कारण शाकाहारी व्यक्ती निरोगी असतो. ध्यान केल्यामुळे कोणतेही आजार होत नाही. मात्र व्यक्ती राष्ट्राची सेवा करण्यात तल्लीन राहतो.

पक्षाचे अध्यक्ष सौरभ बंसल यांनी आंध्र एसोसियेशनच्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे घोषणापत्र जाहीर केले आहे. ब्रह्मर्षि यांनी असे ही सांगितले की, आम्ही राष्ट्रीय स्तरावर आमचे स्थान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आंध्र प्रदेशापासून आम्ही याबाबत सुरुवात केली होती. मात्र आता लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर भारतातून अभियान सुरु करणार आहोत.

या पक्षाच्या सदसत्व मिळण्यासाठी फक्त 10 रुपये मोजावे लागणार आहेत. या सदस्यांची निवड स्क्रिनिंग कमेटी करणार असून त्यामध्ये व्यक्ती शाकाहारी आहे की नाही ही बाब मुख्यत्वे पाहण्यात येणार आहे. सौरभ बंसल यांनी आगामी निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या घोषणापात्राद्वारे असे म्हटले आहे की, आमच्या पक्षाचे लक्ष जनतेला उत्तम वैद्यकीय सुविधा देणे आहे. तसेच जनवितरण प्रणालीत सुधारणा केल्यामुळे जनेला त्यांच्या आवश्यक वस्तुंची सुविधा कोणत्याही अटीशिवाय प्राप्त होतील. त्याचसोबत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणार असून पदवी पर्यंतचे शिक्षण ही मोफत दिले जाणार आहे.