Lockdown: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता करणार देशला संबोधित; कोरोना व्हायरस, लॉकडाऊन याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता
PM Modi addressing the nation | (Photo Credits: DD News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (मंगळवार, 14 एप्रिल 2020) सकाळी 10 वाजता देशाला संबोधित (Address To The Nation) करणार आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या निवारणासाठी देशभरात सुरु असलेला लॉकडाऊन (Lockdown In India) आज रात्री 12 वाजता संपत आहे. त्यामुळे आजच्या भाषणात पंतप्रधान हा लॉकडाऊन वाढविण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी केलेल्या ट्विटमध्ये 'पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिल 2020 च्या सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.' असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात 19 आणि 24 मार्च 2020 या दिवशी देशाला संबोधित केले होते. 19 मार्च रोजी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस पासून नियंत्रण मिळविण्यासठी संकल्प आणि संयम राखण्याचे अवाहन केले होते. सोबत, 22 मार्च 2020 (रविवार) या दिवशी 'जनता कर्फ्यू'चे अवाहनही केले होते. (हेही वाचा, Coronavirus Outbreak In India: भारतात गेल्या 24 तासात 905 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 51 जणांचा मृत्यू; देशातील कोरोना बाधितांची संख्या 9352 वर पोहोचली)

एएनआय ट्विट

पंतप्रधान कार्यालय ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस प्रसार रोखण्यासाठी 24 मार्च या दिवशी 21 दिवसांचा राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यासोबतच 3 एप्रिल या दिवशी एक व्हिडिओ संदेश जारी करत लोकांना 5 एप्रिल या दिवशी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी घरातील लाईट बंद करुन दीवे, मेणबत्ती, मोबाईल लाईट अशा गोष्टी लाऊन देशाची एकात्मता दाखवून देण्याचे अवाहन केले होते.