Prime Minister Gets Emotional: कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या आठवणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक; म्हणाले 'व्हायरसमुळे प्रिय व्यक्ती गमावल्या'
PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीत देशभरात अनेक नागरिकांनी प्राण गमावले. कोरोनामुळे प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (21 मे 2021) संवाद साधला. हा संवाद साधताना पंतप्रधान मोदी काहीसे भावूक झालेले पाहायला मिळाले. या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेकी, कोरोना व्हायरस संसर्गामळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. अनेक प्रिय लोक या व्हायरसमुळे आपल्याला सोडून गेले. आपल्यातून निघून गेलेल्या लोकांप्रति मी विनम्र श्रद्धांजली अर्पन करतो. तसेच, ज्या लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले अशांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. हे वक्तव्य करत असताना पंतप्रधानांचा आवाज काहीसा धीरगंभीर आणि कापरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथील डॉक्टर्स आणि फ्रंटलाईन वर्करसोबत व्हिडओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून संवाद साधत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, कोरोना व्हायरस संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत आम्ही अनेक आव्हानांविरुद्ध लढत आहोत. संक्रमणाचा वेग अधिक आहे. रुग्ण प्रदीर्घ काळ रुग्णालयात आहेत. ही आनंदाची वेळ नाही. लढाई खूप दूरवर लढावी लागणार आहे. आता आम्हाला बनारस आणि पूर्वांचलच्या ग्रामिण भागाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. आता आमचा मंत्र असेन जिथे आजार तिथेच उपचार. आपण जितके उपचार करु, तितकाच आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे जिथे आजार तेथेच उपचार या मंत्राने काम करा.

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, कोरोना लसीकरणासाठी आम्ही जन अभियान मोहिमेवर अधिक भर दिला. डोक्यातील तापामुळे या आधी उत्तर प्रदेशमध्ये हजारो मुले मरत असत. योगी आदित्यनाथ तेव्हा खासदार होते. एकदा ते संसदेत रडले होते हा सिलसीला प्रदीरघ काळ चालणारआहे. जेव्हा योगी मुख्यमंत्री बनले आणि भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी डोक्याच्या तापाविरुद्ध अभियान सुरु केले तेव्हा ह आव्हान काहीसे कमी झाले. पंतप्रधानांनी काळ्या बुरशीच्या आजाराकडेही या वेळी लक्ष वेधले. तसेच, काळी बुरशी हा आजार डोके वर काढतो आहे. त्यामुळे आताच त्याबाबत नियोजन करणे आवश्यक असल्याचे म्हटले.